भारतीय रेल्वे दहशतवाद्यांच्या
टार्गेटवर असल्याचा अहवाल
भारतीय रेल्वे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. आयएसआयनं रेल्वेवर दहशतवादी हल्ल्याचा कट रचला आहे. आयएसआयचा घातपाती कारवायांचा हा कट उघड झाला आहे. यानंतर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गुप्तहेर यंत्रणांनी या संदर्भात अलर्ट जारी केलाय. पंजाब आणि इतर आसपासच्या राज्यात रेल्वे गाड्या, रेल्वे स्टेशन्स, रेल्वे ट्रॅक यांना दहशतवाद्यांकडून मोठा धोका असल्याचा अलर्ट देण्यात आलाय. आयएसआयने यासाठी स्थानिक हस्तकांना मोठ्या प्रमाणात फंडींग केलंय. भारतातल्या आयएसआयच्या स्लीपर सेल्स अॕक्टिव्ह झाल्या आहेत.
ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणाची सुनावणी
पूर्ण मंगळवारी निकालाची शक्यता
ज्ञानवापी मशीद वाद प्रकरणाची आज जिल्हा न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. उद्या, मंगळवारी दुपारी २ वाजता निकाल सुनावण्यात येणार आहे. तसेच पुढील सुनावणी कशी होणार, याची रूपरेषा काय असेल, हे उद्या सांगण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण वाराणसी कोर्टाकडे वर्ग केले होते. सुप्रीम कोर्टाने ८ आठवड्यात सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर
मुंबईत सतर्कता
करोना विषाणूच्या संसर्गानंतर आता जगभर मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत आहेत. आफ्रिकन देशांसोबत युरोपातही मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जगभराची चिंता वाढताना दिसत आहे. मंकीपॉक्सच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेनं तयारी सुरू केली आहे. अद्याप मुंबईत मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र सतर्कतेचं पाऊल म्हणून मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं योग्य ती पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
संजय राऊत यांच्याविरोधात 100 कोटी
रुपयांचा मानहानीचा दावा
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.
संजय राऊत यांनी मेधा किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामात मेधा सोमय्या आणि त्यांच्या पतीने 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे ते म्हणाले होते.
राज्यात इंधन दरकपातीचा
निर्णय नाहीच : देवेंद्र फडणवीस
महाविकास आघाडी सरकारने राणाभीमदेवी थाटात राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाल्याची माहिती शासकीय ट्विटर हँडलवरून प्रसारित केली. प्रत्यक्षात ही शुद्ध फसवणूक आहे. महाविकास आघाडी सरकारने दरकपातीचा कोणताच निर्णय घेतला नाही. तर केंद्राच्या निर्णयाचा हा स्वाभाविक परिणाम आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय
युद्धामध्ये वृद्धाची हत्या केल्याप्रकरणी
सैनिकाला जन्मठेपेची शिक्षा
रशिया आणि युक्रेन दरम्यान २४ फेब्रुवारीपासून युद्ध सुरु आहे. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनची अनेक शहरे उद्ववस्त झाली आहेत. या दरम्यान युक्रेनच्या न्यायलयाने पहिल्या युद्ध गुन्ह्याच्या खटल्यात एका नि:शस्त्र नागरिकाची हत्या केल्याप्रकरणी रशियन सैनिकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. वादिम शिशमारिन असे या रशियन सैनिकाचे नाव आहे. २१ वर्षीय रशियन टँक कमांडर वादिम शिशिमारिनवर ६२ वर्षीय युक्रेनियन वृद्धाची हत्या केल्याचा आरोप आहे.
2030 पर्यंत भारतात सर्वाधिक
हृदयविकाराने मृत्यू होण्याची शक्यता
२०३० सालापर्यंत जगात हृदयविकारामुळे सर्वाधिक मृत्यू होण्याचे कुख्यात वैशिष्टय़ भारताच्या वाटय़ाला येणार असून, दर चौथा मृत्यू हृदय व रक्त वाहिन्यांसंबंधीच्या रोगांमुळे होईल, असा इशारा प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सी. एन. मंजुनाथ यांनी दिला. या संकटाला तोंड देण्यासाठी ताण व्यवस्थापन आणि आरोग्यदायी जीवनशैलीच्या सवयी आत्मसात करण्यासह समग्र एकात्मिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन येथील ‘श्री जयदेव इन्स्टिटय़ूट ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सायन्सेस’चे संचालक मंजुनाथ यांनी ‘एचएएल मेडिकॉन २०२२’ला संबोधित करताना केले. हिंदूस्तान एरॉनॉटिक्स लि.मधील डॉक्टरांसाठी ही राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती.
प्रकृती खालावल्याने नवज्योत
सिद्धू रुग्णालयात दाखल
पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू ३३ वर्षे जुन्या ‘रोड रेज’ प्रकरणात कारागृहात शिक्षा भोगत आहेत. दरम्यान सिद्धू यांची तब्येत बिघडली असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पटियाळा येथील राजेंद्र रुग्णालयात नेण्यात आले आहे. तुरुंगातील पोळी-भाजी खाण्यास सिद्धू यांनी नकार दिला होता. सिद्धूंना गव्हाची ऍलर्जी आहे. त्यांना यकृताचा त्रास आहे. हे पाहता सिद्धूंनी तुरुंग प्रशासनाकडे विशेष आहाराची मागणी केली आहे. त्यानंतर तुरुंग प्रशासनाकडून त्यांना उकडलेल्या भाज्या आणि कोशिंबीर देण्यात येत होते.
भारतीय क्रिकेटपटूनेच दिला ऋषभ पंतला धोका, दीड कोटी रुपयांना लुटलं!
टीम इंडियाचा विकेट कीपर बॅटर ऋषभ पंत याला दीड कोटी रुपयांना लुटण्यात आलं आहे. मुख्य म्हणजे हरियाणाच्या एका क्रिकेटपटूनेच ऋषभ पंतला धोका दिला आहे. मृणांक सिंग नावाच्या या क्रिकेटपटूला पोलिसांनी या महिन्यात दुसऱ्या प्रकरणात अटक केली होती. पंतने त्याचा मॅनेजर पुनित सोळंकीसोबत मृणांकविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. दिल्लीच्या एका कोर्टाने मृणांक सिंगला हजर करण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये एक नोटीस पाठवली होती.
करण जोहरवर चोरीचा आळ; पाकिस्तानी व्यक्तीनं गाणं तर दुसऱ्यानं स्क्रिप्ट चोरल्याचा केलाय आरोप
करण जोहरचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘जुग जुग जिओ’ अखेर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. रविवारी (22 मे 2022) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. वरुण धवन , कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 24 जून 2022 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. मात्र, ट्रेलर लाँचसोबतच हा सिनेमा नव्या वादात अडकल्याचं दिसून येतंय.
मुंबईत आता फक्त ईलेक्ट्रिक BEST बसेसच धावणार, 2100 नव्या गाड्या वर्षभरात दाखल!
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईची लाईफलाईन म्हणून लोकल सेवा ओळखली जाते तशीच बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन अर्थात बेस्टची बस सेवाही प्रसिद्ध आहे. आता बेस्ट बसने कात टाकली असून लवकरच 2100 इलेक्ट्रिक बसेस ताफ्यात येणार आहे. मुंबईत आता फक्त इलेक्ट्रिक बसेस दिसणार आहे. पुढच्या वर्षभरात एकूण 2100 बसेस मुंबईच्या रस्त्यावर धावणार आहे. बेस्ट बसेसच्या ताफ्यात आता वर्षभरात एकूण 2100 नव्या इलेक्ट्रिक बसेस दाखल होत आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट कडून 2100 इलेक्ट्रिक बसेससाठी सर्वात मोठी मागणी मिळवली आहे. या मागणीचे मूल्य तब्बल 3675 कोटी इतके आहे.
SD social media
9850 60 3590