कोविड महामारी पूर्णपणे संपलेली नाही : WHO

देशावरून अजूनही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. अजूनही कोरोनाची प्रकरणं समोर येताना दिसतायत. मात्र आता परिस्थिती पूर्वीसारखी गंभीर नसून मृत्यूचं प्रमाणही कमी आहे. तरीही कोविड महामारी पूर्णपणे संपलेली नाही, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) प्रमुखांनी रविवारी दिला.

डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसिस यांनी सरकारना त्यांच्या स्वत:च्या जोखमीवर बचाव नियम कमी करण्याचं आवाहन केलंय. जिनेव्हा संस्थेच्या वार्षिक बैठकीचं उद्घाटन करताना त्यांनी याबाबत माहिती दिली.

डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसिस म्हणाले की, कोरोनाच्या नमुन्यांची चाचणी न होणं म्हणजे कोरोनाचा परिस्थितीकडे लक्ष न देण्यासारखं आहे. अजूनही कमी उत्पन्न असलेल्या देशांतील एक अब्ज लोकांना कोरोनाची लस मिळालेली नाही.

मार्चनंतर अनेक आठवड्यांपासून व्हायरसच्या नवीन प्रकरणांमध्ये घट झाली आहे. शिवाय मृत्यूच्या संख्येतही घट झाली आहे. परंतु परिस्थिती सुधारल्यानंतर आणि जगातील 60% लोकांचे लसीकरण झाल्यानंतरही कोविड महामारी सर्वत्र संपलेली नाही, असं त्यांनी सांगितलं.

ओमायक्रॉनच्या सब-व्हेरिएंटची भारतात एन्ट्री
कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या BA.4 सब-व्हेरिएंटने भारतात शिरकाव केला होता. त्या पाठोपाठ आता BA.5 चंही एक प्रकरण समोर आलं आहे.

जीनोम सिक्वेन्सिंगसाठी आरोग्य मंत्रालयाने प्रमाणित केलेल्या INSACOG ने याला दुजोरा दिला आहे. तामिळनाडूमधील एका 19 वर्षीय मुलीला कोरोनाच्या BA.4 प्रकाराची लागण झाली आहे. रुग्णामध्ये सौम्य लक्षणे आढळून आली असून तिचं संपूर्ण लसीकरण झालं होतं. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या हैदराबादमधील एका व्यक्तीलाही याच प्रकाराची लागण झाल्याचं आढळून आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.