संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षपदी शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी अमिरातीचे अध्यक्ष खलीफा बिन जायेद अल नाह्यान यांच्या निधन झाले. त्यानंतर सात अमिरातींच्या अबुधाबीतील अल मुश्रीफ महालात झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्या घराण्याकडे संयुक्त अरब अमिरातीची वंशपरंपरेने सत्ता आहे. १९७१ मध्ये या सात अमिराती एकत्र येऊन स्वतंत्र देशनिर्मितीनंतर अवघ्या तिसऱ्यांदा सत्तेचा खांदेपालट झाली.
शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांचे निधन झाल्याने ही निवड करण्यात आली आहे.शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांचे निधन झाल्याने
दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच शुक्रवारपासून 40 दिवस UAE चा ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कार्यालयातील कामकाजही पहिले 3 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे”, अशी माहिती स्थानिक वृत्तसंस्था डब्ल्यूएएमने दिली आहे.