दिल्लीतील एका इमारतीला भीषण आग लागली आहे. पश्चिम दिल्ली परिसरातील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील एका इमारतीला संध्याकाळी भीषण आग लागली. मुंडका मेट्रो स्थानकाजवळील खांबा क्रमांक 544 जवळील इमारतीला ही आग लागली.
आग लागल्याचं समजताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 24 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे.
ही आग इतकी भीषण आहे की यात अख्खी बिल्डिंगच आगीच्या विळख्यात सापडली. दुर्देवाने या आगीत 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. तसेच या बचावकार्यात स्थानिकही मदत करत आहेत. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.