राज्यात उष्णतेमुळे सर्वांना नकोसं झालंय. गरमीमुळे शरीराची लाहीलाही होतेय. फक्त चातकच नाही, तर सर्वसामान्यही पावसाची आतुरतेने वाट पाहतायेत. तसेच यंदा समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात 10 दिवस पाऊस आधी येणार असल्याचं म्हटलं होतं. पण आज सांगलीत अचानक दमदार वादळी पाऊस झाला.
जिल्ह्यात आज संध्याकाळनंतर दमदार वादळी पाऊस झाला. जिल्ह्यात दुपारनंतर सर्वत्र ढगाळ वातावरण होतं. शहरी भागात मिरज, सांगली इथून पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी पाऊस पडला. अचानक झालेल्या यामुळे उष्णतेने हैराण झालेल्यांना दिलासा काही वेळ का होईना, दिलासा मिळाला.
वादळामुळे यंदाच्या वर्षी लवकर मान्सून सुरू होणार असल्याची शक्यता हवामान शाळेने व्यक्त केली आहे. दरम्यान राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये उन्हाचा कडाका वाढलेला असल्याने नागरिकांना देखील लवकर यातून सुटका कशी करून घेता येईल, याची काळजी वाटत आहे त्यामुळे लवकर येणारा मान्सून नागरिकांसाठी दिलासा देणारा ठरणार आहे. वादळामुळे राज्यातील बहुतांश भागामध्ये कमी अधिक प्रमाणात काल रात्री पाऊस झाला आहे. तर सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे.