दिल्लीतील सिव्हिल लाइन्स भागात प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक राम किशोर अग्रवाल यांची हत्या करण्यात आली होती, ज्यानंतर पोलिस आरोपींचा शोध घेऊ लागले. अखेरीस, दिल्ली पोलिसांनी याप्रकरणार दोन अल्पवयीन मुलांना पकडले, ज्यांनी पूर्ण नियोजन करून राम किशोर यांची हत्या केली होती. पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, या आरोपींनी प्रथम वृद्धाचा उशीने गळा दाबला आणि नंतर चाकूने त्यांची मान कापली. यानंतर पोटावर आणि मानेवर तीन वार करण्यात आले. तसेच सुडाच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आल्याचं उघड झालं.
खरंतर या आरोपींपैकी एक व्यक्ती असा होता, जो यापूर्वी राम किशोर यांच्याकडे काम करत होता, परंतु चोरीच्या आरोपाखाली त्याला कामावरुन काढून टाकण्यात आलं, ज्यामुळे मनात सूडाची भावना ठेवून, या आरोपींनी ही हत्या केली होती.
एवढेच काय तर या आरोपींनी गुगल आणि यूट्यूबवर गुन्ह्याशी संबंधित बारकावेही जाणून घेतले होते. त्यानंतर त्यांनी राम किशोर यांची हत्या केली.
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे विशेष सीपी रविंदर सिंग यादव यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी सकाळी सिव्हिल लाइन्स परिसरात व्यापारी राम किशोर अग्रवाल यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.
त्यानंतर पोलिसांना असा संशय होता की, कोणत्यातरी ओळखीच्या व्यक्तीने हा गुन्हा केला असाव, कारण हत्या केलेल्या व्यक्तीला घरातील प्रत्येक कोपऱ्याची, व्यवसायाची माहिती होती.
पोलिसांच्या पथकाने जवळच बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले आणि तांत्रिक निगराणीची मदत घेतली, त्यामुळे त्यांना अतिशय महत्त्वाची माहिती मिळाली. त्यांना राम किशोर यांच्या घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामुळे कळालं की, आरोपी एक दिवसापूर्वी दुचाकीवरून तेथे आले होते, मात्र तो दुचाकीवरून ते परतले नाही. ज्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर संशय आला.
ज्यानंतर या आरोपींना मेट्रोने प्रवास करत असताना पकडले गेले. यासाठी पोलिसांनी डीएमआरसीचीही मदत घेतली. 2 मे रोजी आरोपींनी मेट्रोने प्रवास केला नाही, मात्र 3 मे रोजी आरोपी मेट्रोमध्ये शिरताच पोलिसांना याची माहिती मिळाली.ज्यामुळे त्यांना अटक करण्यात आलं.
खरंतर या आरोपींना घटनास्थळावरुन 11 लाख रुपये, काही डॉलर, दागिने, घड्याळ चोरी केले होते, जे नंतर पोलिसांकडून जप्त करण्यात आले. आरोपींनी पोलिसांकडे हे उघड केले की, ते अनेक महिन्यांपासून या दरोड्याचा कट रचत होते, ज्यासाठी त्यांनी युट्यूब आणि गुगलची मदत घेतली.
हत्येपूर्वी दोघांनी लजपत राय मार्केटमधून एक खेळण्यातील पिस्तूल आणि चावडी मार्केटमधून भाजी कापण्याचे दोन चाकू खरेदी केले होते. त्यांनी २८ एप्रिल रोजी वजिराबाद परिसरातून दुचाकी चोरली.
घटनेच्या आदल्या रात्री दहाच्या सुमारास दोघेही पीडिताच्या घराजवळ पोहोचले. दोघांनीही दुचाकी तेथे लावली आणि तेथून निघून गेले. कारण त्यांना हे माहित होतं की, त्यांना सकाळी दुचाकीने प्रवेश मिळणार नाही. कारण तेथे रक्षक तैनात आहे. ज्यानंतर या आरोपींनी सुरक्षा रक्षकाच्या खोलीला बाहेरुन कुलूप लावलं.
आरोपीला माहित होते की राम किशोर रोज सकाळी 5.30 वाजता लॉनमध्ये फिरायला त्याच्या खोलीचा दरवाजा उघडतो आणि कुटुंबातील कोणताही सदस्य इतक्या लवकर उठत नाही. त्यामुळे सकाळ होण्याची या आरोपींनी वाट पाहिली आणि नंतर राम किशोर दरवाजा उघडताच त्यांच्या वर वार केले.