महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. राज्य लोकसेवा आयोगाने मुलाखतीनंतर अवघ्या काही तासातच हा निकाल जाहीर केला आहे.
या परीक्षेत पुणेकर प्रमोद चौगुलेने बाजी मारली आहे. प्रमोदने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर नितेश कदमने दुसरा आणि रूपाली मानेने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
मुलाखती 18 तारखेपासून सुरु होत्या. या सुरू असलेल्या मुलाखती आज संपल्या. मुलाखती संपून काही तास ओलांडत नाहीत, त्या आताच आयोगाने निकाल जाहीर केले. या परीक्षेद्वारे वर्ग एकची पदं भरण्यात येणार आहेत. दरम्यान प्रमोद चौगुलेने अव्वल क्रमांक पटकावल्याने त्याचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
राज्यभरातून या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी प्रयत्न करत असतात. पदवीधर झाल्यानंतर ही परीक्षा देता येते. अलीकडच्या काळामध्ये एमपीएससी परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली असल्याने अनेक विद्यार्थी यासाठी प्रयत्न करत असतात.
अपमान सहन करून बनली IAS success story इथे वाचा
:https://upscgoal.com/upsc-2022-ias-priyanka-shukla-unique-success-story-in-hindi/