कोरोनाविरोधात लढण्यासाठी लस हेच कवच आहे. लहान मुलांना लसीकरणासाठी प्राधान्य द्या, असा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या. मोदी म्हणाले, पंचसूत्रीचे पालन करा, अशी सूचना मोदी यांनी राज्यांना केल्या. देशातील कोविड-19 परिस्थितीवर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी या सूचना केल्यात.
या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, जगातील इतर देशांची परिस्थिती पाहता आपण अधिक सावध राहण्याची गरज आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्णही वाढले आहेत. याबाबत मोदी यांनी चिंता व्यक्त केली. इतर देशांच्या तुलनेत कोविड संकट चांगल्या प्रकारे व्यवस्थापित हाताळली. आम्ही आता राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची वाढ पाहत आहोत. आपल्याला सतर्क राहावे लागेल. हे स्पष्ट आहे की, कोविड आव्हान अद्याप संपलेले नाही.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी बैठकीत चर्चा झाली आहे. रुग्णालयांमध्ये सर्व आवश्यक उपकरणांची उपस्थिती सुनिश्चित करणे आवश्यक आहे आणि जर काही कमतरता असेल तर त्याची उच्च स्तरावर दखल घेणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, आम्ही कोरोनाविरुद्ध लढत राहू आणि मार्गही शोधत राहू.
कोरोनाबाबत पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्रीशी संवाद साधताना म्हणाले की, कोरोनाचा धोका अद्याप संपलेला नाही आणि लस ही त्याच्याशी लढण्यासाठी सर्वात मोठी ढाल आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यांची भूमिका महत्त्वाची आहे. कोरोना काळात आपण चांगले काम केले आहे. त्यामुळे भविष्यात धोका लक्षात घेऊन काम केले पाहिजे, असे ते म्हणाले.