भाजपा नेते किरीट सोमय्या खार पोलीस स्थानकात पोहोचले होते. मात्र, परत जाताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यात किरीट सोमय्या किरकोळ जखमी देखील झाले. यासंदर्भात मुंबई पोलिस टीकेच्या केंद्रस्थानी असताना त्यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत हनुमान चालीसाच्या नावाने गोंधळ घालण्यात आल्याचं गृहमंत्री यावेळी म्हणाले. “दोन घटना काल घडल्या आहेत. गेले दोन दिवस सतत हनुमान चालीसाच्या नावाने गोंधळ घालण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी योग्य ती कारवाई म्हणून त्यांना अटक केली आहे. काल रात्री जी घटना घडली त्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलीस आपली कारवाई करतील”, असं वळसे पाटील म्हणाले.
दरम्यान, यासंदर्भात सगळ्यांनी समजुतीनं घ्यावं, असं आवाहन वळसे पाटील यांनी केलं आहे. “दुर्दैवाने अशी घटना घडली आहे. पण त्यात सगळ्यांनीच समजुतीनं सहकार्य करायला हवं. दगडफेक झाली आहे हे खरं आहे. ती कुणाकडून झाली काय झाली, हा तपासाचा भाग आहे. त्याचा तपास करून पोलीस योग्य ती कारवाई करतील”, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहे.
या सर्व प्रकरणानंतर मुंबई पोलीस टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मुंबई पोलिसांच्या समोर किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप भाजपानं केलं आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांना काही वेगळे आदेश देणार का? अशी विचारणा करताच दिलीप वळसे पाटील यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं