सर्वच क्रिकेटरसिकांना प्रतिक्षा असलेली घोषणा अखेर झालीय. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगली यांनी आयपीएल २०२२ च्या (IPL 2022) प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याची तारीख आणि ठिकाणाची घोषणा केलीय. आयपीएल २०२२ चे सर्व साखळी सामने मुंबई आणि पुण्यात होणार हे आधीच स्पष्ट होतं. मात्र, प्ले ऑफ आणि अंतिम सामना कधी आणि कोठे होणार याबाबत स्पष्टता नव्हती. अखेर त्यावरीलही पडदा हटला आहे.
बीसीसीआयने केलेल्या घोषणेनुसार, आयपीएल २०२२ चा अंतिम सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. तसेच प्ले ऑफ आणि इलेमिनेटर सामने अनुक्रमे २४ मे आणि २६ मे रोजी कोलकात्यात होणार आहे. दुसरा प्ले ऑफ सामना २७ मे रोजी अहमदाबादमध्ये होईल.
अंतिम सामना वेळापत्रक
आयपीएल २०२२ प्लेऑफ पहिला सामना – २४ मे २०२२ – कोलकाता
आयपीएल २०२२ एलिमिनेटर – २६ मे २०२२- कोलकाता
आयपीएल २०२२ प्लेऑफ दुसरा सामना – २७ मे २०२२ – अहमदाबाद
आयपीएल २०२२ फायनल – २९ मे २०२२ – अहमदाबाद
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध मालिकेची घोषणा
याशिवाय बीसीसीआयने भारत आणि दक्षिण अफ्रिकेमधील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेचीही घोषणा केली.
दक्षिण अफ्रिका मालिका वेळापत्रक
९ जून २०२२ – पहिला टी-२० सामना – दिल्ली
१२ जून २०२२- दुसरा टी-२० सामना – कटक
१४ जून २०२२ – तिसरा टी-२० सामना – विजाग
१७ जून २०२२ – चौथा टी-२० सामना – राजकोट
१९ जून २०२२ – पाचवा टी-२० सामना – बंगळुरू
आयपीएल चा इतिहास जाणून घ्या इथे: https://upscgoal.com/ipl-2022-fact/