सनरायजर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (SRH) 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. आरसीबीने विजयासाठी दिलेल्या 69 धावांचे आव्हान हैदराबादने 8 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून पूर्ण केलं. हैदराबादचा हा या मोसमातील पाचवा विजय ठरला.
हैदराबादकडून अभिषेक शर्माने 47 धावांची खेळी केली. तर कॅप्टन केन विलियमसनने नॉट आऊट 16 रन्स केल्या. तर राहुल त्रिपाठीने सिक्स मारत हैदराबादला विजय मिळवून दिला. बंगळुरुकडून हर्षल पटेलने एकमेव विकेट घेतली.
त्याआधी हैदराबादच्या भेदक गोलंदाजीपुढे आरसीबीचा डाव 16.1 ओव्हरमध्ये अवघ्या 68 धावांवर आटोपला. आरसीबीकडून सुयश प्रभुदेसाईने सर्वाधिक 15 धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेलने 12 रन्स काढल्या. या व्यतिरिक्त आरसीबीच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
हैदराबादकडून मॉर्को जान्सेन आणि टी नटराजनने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. जे सुचिथने 2 फलंदाजांचा काटा काढला. तर उमरान मलिक आणि भुवनेश्वर कुमार या दोघांनी 1 विकेट घेत इतर गोलंदाजांना चांगली साथ दिली.
एसआरएच प्लेइंग इलेव्हन : केन विलियमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंह, जगदीशा सुचित, भुवनेश्वर कुमार, मार्को यानसन, टी नटराजन आणि उमरान मलिक.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन : फाफ डुप्लेसी (कॅप्टन), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदु हसारंगा, हर्षल पटेल, जॉश हेजलवुड आणि मोहम्मद सिराज.