कोरोनाची दुसरी लाट जगभरामध्ये आपला प्रभाव सोडवत असतानाच भारतामध्ये देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासात देशातील रुग्णसंख्या नऊ हजारापर्यंत वाढली असून जवळपास आतापर्यंत 90 हजारावर बाधित रुग्णांची संख्या पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा देखील तीनशेच्या जवळपास पोहोचला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकडेवारी जाहीर केली आहे. देशात २४ तासांत ८९ हजार १२९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर ४४ हजार रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. या कालावधीत ७१४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या देशात ६ लाख ५८ हजार ९०९ रुग्ण उपचार घेत असून, आतापर्यंत १ लाख ६४ हजार ११० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कानपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे वैज्ञानिक मणिंद्र अग्रवाल यांच्या अंदाजानुसार सध्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे ते एप्रिलपर्यंत शिखरावस्था गाठेल. सध्या कोरोनाची जी लाट आहे ती एप्रिलमध्यापर्यंत जास्त राहील नंतर रुग्णांची संख्या कमी होईल. त्यानंतर मे महिना अखेरीपर्यंत रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होईल, असं म्हटलं आहे. कोविडच्या पहिल्या लाटेत भारतात ‘सूत्र’ या गणिती प्रारूपाचा वापर करण्यात आला होता, त्याचाच वापर करून आता वैज्ञानिकांनी असे सांगितले होते, की ऑगस्टमध्ये रुग्णांची संख्या जास्त राहील नंतर ती सप्टेंबरमध्ये अधिक असेल, फेब्रुवारी २०२१ मध्ये ती कमी राहील. तो अंदाज जवळपास खरा ठरला आहे याचा अर्थ हे प्रारूप यशस्वी झाले आहे