इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या (IPL 2022) १५ व्या हंगामातील ३४ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्समध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झाला. यात राजस्थानने दिल्लीचा पराभव करत १५ धावांनी विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर राजस्थान रॉयल्सने दमदार फलंदाजी करत २० षटकात २ विकेट गमावून २२२ धावांचा डोंगर उभा केला. आता दिल्लीला विजयासाठी २२३ धावांचा पाठलाग करावा लागेल.
दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. आयपीएलमधील हे दोन्ही संघ तुल्यबळ होते. आतापर्यंतच्या आयपीएलच्या सामन्यात या दोन्ही संघांचा एकूण २५ वेळा सामना झालाय. यात दिल्लीने १२ वेळा, तर राजस्थानने १३ वेळा विजय नोंदवला.
राजस्थानकडून जॉस बटलरने ६५ चेंडूत ११६ धावा केल्या. यात ९ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश आहे. राजस्थानला पहिला धक्का देवदत्तच्या रुपात भेटला. त्याने ३५ चेंडूत ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. देवदत्तने २ षटकार आणि ७ चौकार लगावले.
बटलर शतकी खेळी करून बाद झाल्यानंतर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने दमदार खेळी केली. सॅमसनने १९ चेंडूत नाबाद ४६ धावा केल्या. यात ३ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश आहे. शिमरोन हेटमायरने १ चेंडूत नाबाद १ धाव काढली.
दिल्ली कॅपिटल्सकडून पृथ्वी शॉने २७ चेंडूत ३७ धावा केल्या. यात ५ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. डेविड वॉर्नरने १४ चेंडूत २८ धावा केल्या. यात त्याच्या ५ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. सरफराज खानला ३ चेंडूत केवळ १ धाव काढता आली. ऋषभ पंतने ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २४ चेंडूत ४४ धावा केल्या. ललित यादवने २४ चेंडूत ३७ धावा केल्या. यात त्याच्या ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे