छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे कौन बनेगा करोडपती. माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या शोचे १४ वे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यंदाच्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार आहेत. नुकतंच अमिताभ बच्चन यांनी या पर्वात सहभागी होण्यासाठी दोन प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या स्पर्धकांना केबीसीच्या १४ व्या पर्वात सहभागी होता येणार आहे.
नुकतंच सोनी टिव्हीने याबाबतचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोद्वारे त्यांनी प्रेक्षकांना केबीसीच्या १४ व्या पर्वासाठीची नोंदणी सुरु झाल्याचे सांगितले आहे. नुकतंच या पर्वासाठीचे दोन प्रश्न बिग बींनी जाहीर केले आहे. यातील दुसऱ्या प्रश्नाचा प्रोमो शेअर केला आहे.
नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) मध्ये A या शब्दाचा अर्थ काय?
A. अटलांटिक
B. आर्मी
C. अमेरिका
D. असोसिएशन
या प्रश्नाचे योग्य उत्तर अटलांटिक असे आहे. केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या स्पर्धकांना ११ एप्रिल रात्री ९ पर्यंत या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागणार आहे. काही तासांपूर्वी बिग बींनी या पर्वासाठी पहिला प्रश्न जाहीर केला होता.
‘विरांगणा लक्ष्मीबाई’ रेल्वे स्टेशन असे नुकतेच नामकरण करण्यात आलेले रेल्वे स्टेशन नेमकं कोणत्या शहरात आहे?
A. ग्वालियर
B. झाशी
C. इंदौर
D. इटारसी
या प्रश्नांचे बरोबर उत्तर देणाऱ्या स्पर्धकांना केबीसीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या प्रश्नाचे योग्य उत्तर बी म्हणजेच झाशी असे आहे. झाशी या रेल्वे स्थानकाचे १ जानेवारी २०२२ रोजी ‘विरांगणा लक्ष्मीबाई’ रेल्वे स्टेशन असे नामकरण करण्यात आले.
या प्रश्नाचे अचूक उत्तर देण्यासाठी तुम्ही Sony Liv अॕप देखील डाउनलोड करू शकता. त्यासोबत प्रेक्षकांना फोन मेसेजद्वारेही या प्रश्नाचे उत्तर देता येणार आहे. यासाठी प्रेक्षकांना ५०९०९३ या क्रमांकावर तुमचे योग्य उत्तर आणि वय पाठवावे लागणार आहे. केबीसीच्या १४ व्या पर्वात सहभागी होण्यासाठी आज रात्री ९ पर्यंत तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागणार आहे.