बिहारमधील औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसी आणि तिच्या 6 मैत्रिणींनी विष प्राशन केलं, त्यापैकी 3 जणींचा मृत्यू झाला तर तिघिंची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना कसमा पोलीस स्टेशन हद्दीतील चिरैली गावात घडली.
एकाच वेळी सहा मुलींनी विष प्राशन केल्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. या घटनेचं नेमकं कारण स्पष्ट झालं नसून प्रेमप्रकरणातून मुलींनी हे भयंकर पाऊल उचलल्याचं बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच रफीगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 मुलींनी विष प्राशन केलं, त्यापैकी तीन जणींचा मृत्यू झाला. तर इतर तीन मुलींवर मगध मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तिनही मुलींची प्रकृती चिंताजनक आहे.
मृत्यू झालेल्या मुलींपैकी एका मुलीचं तिच्या भावाच्या मेहुण्यावर प्रेम होतं, तिने त्याला लग्नासाठीही विचारलं होतं, पण त्याने नकार दिला, या नैराश्यातून त्या मुलीने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण तिच्या इतरी पाच मैत्रिणींनी आत्महत्या का केली याबाबत मात्र संभ्रम आहे.
एकामागोमाग 6 जणींनी केलं विष प्राशन
प्रियकराने नकार दिल्याने तरुणीने विष प्राशन केलं. यानंतर तिच्या बाकीच्या मैत्रिणींनीही विष प्राशन केलं. लोकांना या घटनेची माहिती मिळताच सर्वांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तीन मुलींचा मृत्यू झाला.