ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलावंत अभिनेत्री सुहास जोशी यांना नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्याचे वितरण नुकतेच उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संगीत, नाट्य, नृत्य, लोककला या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, पं. सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक यांच्यासह ४४ कलावंतांना वर्ष २०१८ चे संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले होते. तर अकादमी पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या कलावंतांना प्रत्येकी एक लाख रुपये, मानपत्र आणि मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात येते.

संगीत नाटक अकादमीची जनरल कौन्सिल आणि राष्ट्रीय संगीत, नृत्य व नाटक अकादमी यांची गुवाहाटी येथे २६ जून २०१९ रोजी झालेल्या बैठकीत या ४४ कलावंतांना हा सन्मान देण्याचे ठरवले गेल्याचे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने तेव्हा सांगितले होते.

अभिनेत्री सुहास जोशी यांनी मराठी चित्रपट आणि नाटक या क्षेत्रामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या अभिनयाने अनेक मराठी नाटकातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यांनी गाजवलेले अनेक चित्रपट रसिकांच्या कायम स्मरणात राहणारे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.