जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथे चोरट्यांनी एटीएम मशीन फोडून चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या चोरट्यांनी एटीएम मशीन कटरने फोडले आणि 9 लाखांची रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासोदा येथील बिर्ला चौक परिसरात ही घटना घडली आहे. या चौकात असलेल्या युनियन बँकेचे एटीएम मशीन आहे. चोरटे मध्यरात्री एटीएम मशीनमध्ये घुसले आणि गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापले. एटीएम मशीनमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नये म्हणून चोरट्यांनी तोंडावर रुमाल बांधलेला होता.
सकाळी जेव्हा स्थानिक दुकानादार आले असताना त्यांना एटीएममशीन फोडल्याचे आढळून आले. त्यामुळे तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहिली करून पंचनामा केला. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.