रश्मी शुक्ला यांच्याकडून करण्यात आलेल्या एकनाथ खडसे यांचा फोन टॅपिंग प्रकरणात कुलाबा पोलिसांनी खडसेंना समन्स बजावला आहे. कुलाबा पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी एकनाथ खडसे यांना गुरुवारी हजर राहण्यास सांगितले आहे. एकनाथ खडसे कुलाबा पोलीस ठाण्यात जवाबासाठी 11 वाजता हजर राहणार आहेत.
रश्मी शुक्ला राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी रश्मी शुक्लांवर फोन टॅपिंगचा आरोप केला होता. त्यानुसार रश्मी शुक्लांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याआधी देखील रश्मी शुक्ला प्रकरणाचा तपासाची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यानुसार विविध अंगांनी तपास केला जात आहे. या प्रकरणाचे धागेदोरे कोठ पर्यंत पोहोचलेले आहे याची देखील माहिती या निमित्ताने घेतली जात आहे. फोन टॅपिंग प्रकरणांमध्ये आणखी कोणा कोणाचा समावेश आहे याचादेखील यंत्रणा तपास करत असल्याची माहिती समोर आलेली आहे. या संपूर्ण चौकशीतून नेमके काय बाहेर येईल याबाबत उत्सुकता लागलेली आहे.