अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे दोघेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध चेहरे आहेत. ऐश्वर्या रायने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांनाच वेड लावले आहे. तिने बॉलिवूडमध्ये अनेक हीट सिनेमे दिले. ज्यानंतर अखेर 2007 मध्ये ती अभिनेता अभिषेक बच्चनसोबत विवाह बंधनात अडकली. अभिषेक बच्चनने देखील अनेक चांगले चित्रपटं दिली, ज्यानंतर आता तो वेबसिरीजसाठी काम करत आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या या दोघांना एक मुलगी आहे आणि हे दोघेही एका सुंदर कुटुंबाप्रामाणे आनंदाने राहात आहे.
आपल्या सगळ्यांना हे तर माहित आहे की, अभिषेक आणि ऐश्वर्याने कधी आणि केव्हा लग्न केलं. परंतु त्यांच्या प्रेम कहाणीबद्दल फारच कमी लोकांना माहित असेल.
तर आज आम्ही त्या दोघांची पहिली भेट आणि प्रेम कहाणीबद्दल सांगणार आहोत. ज्याचा खुलासा स्वत: अभिषेक बच्चने केला आहे.
अभिषेक ने सांगितले की, ऐश्वर्या रायसोबत त्याची पहिली भेट स्वित्झर्लंडमध्ये झाली होती. त्यावेळी ऐश्वर्या तिथे ‘और प्यार हो गया’ या चित्रपटाचे शूटिंग करत होती, ज्यामध्ये तिच्यासोबत बॉबी देओल काम करत होता. त्याचवेळी शुटिंगचे लोकेशन पाहण्यासाठी अभिषेक बच्चनही स्वित्झर्लंडमध्ये गेला होता.
यूट्यूबर रणवीर इलाहबदियाशी झालेल्या संभाषणात अभिषेकने ऐश्वर्या रायसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले होते. तो म्हणाला, “ऐश्वर्यासोबत माझी पहिली भेट मी प्रॉडक्शन बॉय असताना झाली होती. माझे वडील (अमिताभ बच्चन) ‘मृत्युदाता’ नावाचा चित्रपट करत होते. चित्रपटाचे लोकेशन पाहण्यासाठी मी स्वित्झर्लंडला गेलो होतो. कंपनीला वाटले की, मी तिथे मोठा झालो आणि बोर्डिंग स्कूलमध्ये गेलो, त्यामुळे मला तेथील चांगली ठिकाणं सुचवनं शक्य होईल. म्हणून त्यांनी मला पाठवलं.”
अभिषेक पुढे म्हणाला, ”मी काही दिवसांसाठी तिथे गेलो होतो. तेव्हा माझा बालपणीचा मित्र बॉबी देओल त्याचा चित्रपट ‘और प्यार हो गया’चे शूटिंग करत होता. मी पण तिथे असल्याचं कळल्यावर त्याने मला जेवायला बोलावलं. बॉबी आणि ऐश्वर्याला शूट करताना मी पहिल्यांदा पाहिलं आणि तेथे मी ऐश्वर्याला भेटलो.”
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन 20 एप्रिल 2007 रोजी विवाहबद्ध झाल्याची माहिती आहे. 2006 मध्ये ‘उमराव जान’च्या शूटिंगदरम्यान दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती.
यानंतर 2006 मध्ये ‘गुरू’ चित्रपटाच्या प्रीमियरनंतर अभिषेकने न्यूयॉर्कमध्ये ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केले. ज्यानंतर ऐश्वर्या देखीस या लग्नाला हा म्हणाली. आता या दोघांना एक मुलगी देखील आहे, तिचे नाव आराध्या बच्चन आहे.