धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 333 व्या बलिदान स्मरण दिनी महाराजांना मानवंदना देण्यात आली. बलिदान भूमी वढू-तुळापूर येथे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत ही सलामी देण्यात आली. दोन वर्षाच्या निर्बंधांमध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी वढू-तुळापुरात गर्दी झाली होती.
छत्रपती संभाजी महाराज यांना मानवंदना देण्यासाठी अनेक शंभुभक्त वढू येथे दाखल झाले. यावेळी संभाजी महाराज यांच्या नावाच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला आहे. तिथी अनुसार छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी हा दिवस “बलिदान दिवस” म्हणून महाराष्ट्रभर पाळला जातो. छ. संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. छत्रपती संभाजी महाराज यांची अनेक पराक्रम इतिहासामध्ये नोंद आहेत.
छ. संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी एकूण 13 भारतीय आणि विदेशी भाषांचे ज्ञान घेतले होते. त्यात मराठी, संस्कृत, इंगजी, हिंदी आणि पोर्तुगिज या सारख्या भाषांचा समावेश आहे. छ. शिवाजी महाराज यांचे मोठे सुपुत्र संभाजी राजे भोसले महाराज यांचा 1 एप्रिलला स्मृतिदिन आहे. धर्मवीर, शेर शिवा का छावा, अनेक भाषा वर आपले प्रभुत्व मिळवणारे, धर्म अभिमानी, संस्कृत पंडित, पराक्रमी, व्यासंगी, शूरवीर अशी अनेक विशेषज्ञ देऊन ही ज्यांची कीर्तीच वर्णन करताना शब्द अपुरे पडतात, असे छत्रपती संभाजीराजे भोसले.
सुमारे 40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करून ही छत्रपती संभाजी राजांनी स्वराज्य निष्ठा व धर्म निष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारत वर्षाने धर्मवीर ही पदवी बहाल केली. औरंगजेबाने क्रूर अत्याचाराची परिसीमा गाठली, तरी छत्रपती संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. धर्म अभिमानी, शेर का छावा छत्रपती संभाजी महाराजांची 11 मार्च 1689 रोजी फाल्गुन अमावास्यला प्राणज्योत मालवली.