निसर्गाचा चमत्कार! डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं नवजात कबरीत सापडलं जिवंत

जम्मू-काश्मीरच्या बनिहालमधून एक आगळीवेगळी बातमी समोर येतेय. एका नवजात मुलीला म्हणजेच जन्मानंतर लगेचच रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. त्यानंतर नवजात मुलीला दफन केल्यानंतर लगेचच सुमारे एका तासाच्या आत कबरीतून जिवंत बाहेर आलीय. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, स्थानिक लोकांनी मुलीला स्मशानभूमीत दफन करण्यास विरोध केला होता आणि तिच्या कुटुंबानं स्मशानभूमीत दफन करण्याचा आग्रह धरला होता.  अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मुलगी चमत्कारिकरित्या जिवंत सापडल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात आंदोलनं केलं. त्याची दखल घेत प्रशासनाने डिलिव्हरी रूममध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करून चौकशीचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितलं.

सोमवारी मुलीचा जन्म झाला

स्थानिक सरपंच मंजूर अल्यास वाणी यांनी सांगितले की, ही मुलगी बशारत अहमद गुजर आणि शमीना बेगम यांची आहे. नॉर्मल प्रसूतीमुळे सोमवारी उपजिल्हा रुग्णालयात मुलीचा जन्म झाल्याचं त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, हे दाम्पत्य रामबन जिल्ह्यातील बनिहालपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बनकूट गावचे रहिवासी आहेत.

वाणी यांनी आरोप केला की मुलीला मृत घोषित करण्यात आलं आणि तिला दोन तास रुग्णालयात कोणत्याही डॉक्टरांनी पाहिले नाही, त्यानंतर कुटुंबाने तिला होल्लान गावात दफन करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा हे दाम्पत्य रुग्णालयात परतले तेव्हा काही स्थानिक लोकांनी मुलीला स्मशानभूमीत दफन करण्यास विरोध केला, असे त्यांनी सांगितले. यामुळे कुटुंबीयांना सुमारे तासाभरानंतर मुलीला कबरीतून बाहेर काढावं लागलं.

मुलीला कबरीतून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. वाणी यांनी सांगितले की, जेव्हा मुलीला कबरीतून बाहेर काढले तेव्हा ती जिवंत असल्याचे आढळून आले, त्यानंतर कुटुंबीय तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. “प्रारंभिक उपचारानंतर, मुलीला तज्ज्ञ डॉक्टरांनी उपचारासाठी श्रीनगरला पाठवले,” असं त्यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.