शेवटच्या क्षणापर्यंत लढणार; पण राजीनामा देणार नाही : इमरान खान

पाकिस्तानातील राजकीय उलथापालथींनी वेग आला असतानाच पंतप्रधान इमरानन खान यांनी या आठवड्याभरातच दुसऱ्यांदा पाकिस्तानातील नागरिकांना संबोधित केले. इमरान खान यांनी सांगितले की, मी आज तुम्हाला माझ्या मनातील गोष्ट सांगणार आहे. पाकिस्तान आज एका निर्णायक वळणावर उभा आहे. त्यामुळे येणारा रविवार पाकिस्तानसाठी महत्वाच्या निर्णयाचा दिवस ठरणार आहे. अविश्वास प्रस्तावाबरोबरच संसदेमध्ये मतदान होणार आहे. त्याअधीच पाकिस्तान संसदेतील माझे राजकीय विरोधक माझ्या राजीनाम्यासाठी दबाव आणत आहेत, तरीही मी हार मानणाऱ्यांपैकी नाही, त्यामुळे पाकिस्तानातील राजकारणात मी शेवटच्या क्षणांपर्यंत लढत राहणार आहे.

इमरान खान आपले भाषणात म्हणाले की, राजकारणात मी यासाठी आलो आहे की, राजकारणाचा मी अभ्यास केला आहे. त्यामुळे ज्यावेळी मला पुन्हा पुन्हा विचारले जाते की, तुम्ही राजकारणात का आला आहे, त्यावर हेच माझं उत्तर आहे. तसेच त्यांनी सांगितले की, माझ्याजवळ सगळं असतानाही मी राजकारणात प्रवेश केला. कारण पाकिस्तानची पथ घसरताना मी पाहिली आहे, आणि पाकिस्तानाचा तिरस्कारही होतानाही मला दिसले आहे.

पाकिस्तानच्या राजकारणात मी गेल्या 22 वर्षांपासून संघर्ष करत आहे. त्या संघर्षामुळेच मी कधी कुणासमोरही झुकणार नाही, आणि मी माझ्या माणसांनाही मी कोणासमोर झुकू देणारा नाही. हे सांगत असतानाच त्यांनी हे ही सांगितले की, मी माझ्या माणसांना कुणाची गुलामीही करु देणार नाही.

इमरान खान यांनी यावेळीस सांगितले की, पाकिस्तानला कोणत्याही युद्धीत जाण्याचा अधिकार नाही. आणि म्हणूनच 9/11 हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग नव्हता. त्यामुळेच पाकिस्तानने कधीच दहशतवादाचे समर्थन केले नाही, पाकिस्तानकडून नेहमीच दहशतवादाला विरोध करण्यात आला आहे, आणि करत राहिल. यावेळी त्यांनी अमेरिकेकच्या धोरणावर बोट ठेवत सांगितले की, अमेरिकेमुळे 80 हजार पाकिस्तानी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.

यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या संस्थापकांची आठवण करुन देत म्हणाले की,पाकिस्तान संस्थापकांनी रियासत-ए-मदिनाच्या मॉडेलच्या आधारे कल्याणकारी राज्याची कल्पना केली होती, मात्र त्याच्याजवळही पाकिस्तान पोहचू शकला नाही. त्यामुळेच मला राजकारणात प्रवेश करावा असं वाटलं, म्हणून मी राजकारणात उतरलो, त्याचे मुख्य उद्देश्य होता, न्याय सुनिश्चित करणे, दुसरे मानवता आणि तिसरे स्वावलंबन.

इमरान खान यांनी सांगितले की, परराष्ट्र धोरण हे आम्ही आमच्या राष्ट्रासाठी करु. त्यांनी सांगितले भारतात कलम 370 हटवण्यात आले, आणि राज्याचे विभाजन करुन जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन प्रदेश केंद्र शासित करण्यात आले. त्यावेळी याबद्दल आम्ही भारताविरोधात ज्या ज्या ठिकाणी भूमिका मांडायची होती, त्यावेळी त्यावेळी ती आम्ही भूमिका मांडली आहे. हा मुद्दा असला तरी त्याआधीपासून मी भारत आणि पाकिस्तानच्या मैत्रीसाठी प्रयत्न करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.