अमोल कोल्हे साकारणार नथुराम गोडसे यांची भूमिका

नथुराम गोडसेंच्या भूमिकेत काल परवापर्यंत शरद पोक्षेंना बघितलेला महाराष्ट्र आता आणखी एका दिग्गज अभिनेत्याला नथुराम गोडसेच्या भूमिकेत पाहणार आहे. आतार्यंत ऐतिहासिक भूमिकांमध्ये माहीर असलेल्या आणि ऐतिहासिक भूमिकांमधूनच घराघरात पोहोचलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी चक्क नथुराम गोडसे यांची भूमिका एका सिनेमात साकारली आहे. अत्यंत वादग्रस्त असलेल्या नथुराम गोडसे यांची भूमिका साकारणाऱ्या अमोल कोल्हे यांच्या अभिनयाकडे आता चाहत्यांसह सगळ्यांची बारीक नजर असणार आहे. बॉलिवूड प्रॉडक्टने या वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार, ज्या सिनेमात नथुरामाची भूमिका अमोल कोल्हे यांना साकारली आहे, तो सिनेमा महिन्याअखेरीस प्रदर्शित होणार असून या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही निश्चित झाली आहे. 2017 साली नथुराम गोडे हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. Limelight या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे.

30 जानेवारी 1948 या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केली होती. दरम्यान, 30 जानेवारी या दिवसाचा धागा पकडत येत्या 30 तारखेलाच हा सिनेमाता प्रदर्शित होणार आहे. 30 जानेवारी, 2022 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांना बघायला मिळू शकेल.

Why I Killed Gandhi असं या सिनेमाचं नाव असून हिंदी भाषेत तयार करण्यात आलेला हा एक माहितीपट असल्याचंही सांगितलं जातंय. अशोक त्यागी हे या सिनेमाची दिग्दर्शक असून कल्याणी सिंह यांनी या सिनेमाची निर्मितीत केली आहे. तर अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे. गांधीची हत्या का केली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न माहितीपटातून दिसणार आहे.

1964 साली भारतीय सरकारनं गांधीजींच्या हत्येची कारणं शोधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जे.एल.कपूर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला होता. या आयोगानं आपल्या अहवाल 1970 साली सादर केला होता. या अहवालाच्या आधारेच या सिनेमाची सुरुवात होते. या चित्रपटात बोलला जाणारा प्रत्येक शब्दांनशब्द हा कायदेशीर कागदपत्रांमधून घेतलेल्या शब्दांचा अनुवाद असल्याचं सांगितलं जातंय. एकूण 45 मिनिटांची ही फिल्म असून आता या फिल्मबाबत नेमके प्रेक्षक कशा पद्धतीनं प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.