महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यातील चार विद्यार्थ्यांवर बंदी घालत त्यांना चांगलाच दणका दिला आहे. एमपीएससी आयोगाने या विद्यार्थ्यांवर कायमस्वरूपी बंदी घालत परीक्षा देता येणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. यामध्ये नागरे शुभम, भारत रामकिशोर धनराज पवार यांचावर बनावट प्रवेशपत्र अनुक्रमे वापर व तयार केल्याचे समोर आले आहे. मनोज रतन महाजन याने परीक्षेनंतर मूळ उत्तरपत्रिका सोबत घेऊन गेला होता. तर विठ्ठल भिकाजी चव्हाण याने समाजमाध्यमावर आयोगास शिवीगाळ केली होती. यामुळे या चौघांवर ही कारवाई करण्यात आली आहे. आयोगाने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर ट्विट करून ही माहिती दिली आहे.
राज्य लोकसेवा आयोगाकडूना अनेकदा परीक्षा पुढे ढकलल्या, कधी परीक्षा रद्द झाल्याच्या , उत्तरपत्रिकेतील गुणांमध्ये घोळ झाल्याच्या घटनाही अनेकदा घडल्या आहेत. यातून अनेक विद्यार्थी आयोगाच्या विरोधात आक्रमकपणे आपली भूमिका मांडता असतात. नाराज झालेलया विद्यार्थ्यांकडून केल्याच्या जाणाऱ्या टीका -टिप्पणीवर आयोगाने हस्तक्षेप नोंदवला होता. या प्रकारच्या टीकेला रोकण्यासाठी आयोगाने पत्रक काढले होते. या पत्रकामध्ये एखाद्या विदयार्थ्याने आयोगाकडून होणाऱ्या भरती प्रक्रिये संदर्भात आपले मत नोंदवताना योग्य भाषे नोंदवावे असे सांगण्यात आले होते.
कोणत्याही विद्यार्थ्याने आपलं मत नोंदवताना असभ्य ,असंस्कृत, व असंसदीय व अश्लील भाषेत टीका टिप्पणी केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. विद्यार्थ्यंनाकडून होणाऱ्या टीका -टिप्पणीवर आयोगाने आक्षेप घेतल्यास त्या विद्यार्थ्याला परीक्षेलाही मुकावे लागेल असे म्हटले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयोगाने परिपत्रक काढत ही माहिती दिली होती.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयोगाकडे आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र हे मत मांडत असताना विद्यार्थ्यांनी सभ्य भाषेचा वापर करणे आवश्यक आहे. अनेकदा उमेदवारांकडून प्रसारमाध्यमे , समाजमाध्यमांमध्ये आयोगाविषयी बोलतांना असंसदीय शब्दांचा वापर केला जात असल्याचे आयोगानं निदर्शनास आणून दिले होते.
यूपीएससी पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी येथे जाणून घ्या :https://upscgoal.com/upsc-prelims-2022-must-read-books-and-tips-in-hindi/