चीनमध्ये भीषण विमान अपघातात
वैमानिकासह 132 प्रवाशांचा मृत्यू
चीनमध्ये भीषण विमान अपघातात वैमानिकासह 132 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या विमान अपघाताचे भयंकर फोटोही समोर आले होते. DNA द्वारे आतापर्यंत 120 प्रवाशांची ओळख पटवण्यात अधिकाऱ्यांना यश आलं आहे. मात्र अजूनही तपास सुरू आहे. दक्षिण-पश्चिम चीनच्या कुनमिंग शहरात सोमवारी 29,000 फूट उंचावरून विमान जात होतं. विमान लॅण्ड होण्याआधी अपघात झाला. हे विमान डोंगर असलेल्या ठिकाणी कोसळल्याची माहिती होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात
काँग्रेसच्या माजी मंत्र्यांची तक्रार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्याविरोधात काॅग्रेसचे माजी मंत्र्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मागील निवडणुकीत प्रचार संपला. मात्र, प्रचार संपल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आपल्या मतदारसंघात आले होते, असा आरोप काँग्रेसचे मंत्री नसीम खान यांनी केला.
राज्याच्या तिजोरीच्या चाव्या
माझ्या हातात : अजित पवार
सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्ता भरणे यांच्या विभागातून इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक निधी दिला जात आहे. आम्हालाच मामांना विनंती करावी लागते की, बारामतीला देखील काही निधी द्या. बांधकाम विभागाच्या चाव्या त्यांच्या ताब्यात आहेत. पण त्यांना माहीत नाही, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत”, असे अजित पवार म्हणाले. मी तिजोरी उघडली आणि बांधकामाला पैसे दिले तरच ते देणार, नाहीतर काय देणार **…?” असेही अजित पवार म्हणाले.
6 दिवसात देशात पेट्रोल आणि
डिझेलच्या किमती 5 वेळा वाढल्या
गेल्या 6 दिवसात देशात पेट्रोलआणि डिझेलच्या किमती 5 वेळा वाढल्या आहेत. त्यापैकी चार वेळा 80 ते 80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे, तर रविवारी सहाव्यांदा 55 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. रविवारी पेट्रोलमध्ये 50 पैशांनी तर डिझेलमध्ये 55 पैशांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या साडेचार महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली.
मन की बात कार्यक्रमात नाशिकच्या
चंद्रकिशोर पाटील यांच्या कार्याचे कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये बोलताना महाराष्ट्रातील नाशिकच्या चंद्रकिशोर पाटील यांच्या स्वच्छतेच्या कामाची दखल घेत कौतुक केलं आहे. चंद्रकिशोर पाटील गोदावरी नदीच्या काठावर उभे राहून लोकांनी नदीत कचरा टाकू नये म्हणून प्रयत्न करतात. यासाठी ते दिवसभरातील खूप वेळ खर्च करतात, असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं. उस्मानाबादच्या हातमाग वस्तूंचा उल्लेख करत या वस्तू परदेशात निर्यात होत असल्याचं त्यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी म्हणाले, “आरोग्याचा थेट संबंध स्वच्छतेशी जोडलेला आहे. मन की बातमध्ये आपण नेहमी स्वच्छतेचे प्रयत्न जरूर सांगतो. अशाच एका स्वच्छताप्रेमीचं नाव चंद्रकिशोर पाटील असं आहे. ते महाराष्ट्रातील नाशिकमध्ये राहतात.
शेतकऱ्याचा पोरगा झाला RTO इन्स्पेक्टर; कर्जबाजारी आई-वडिलांच्या डोळ्यात आले पाणी
जिद्द आणि चिकाटी असले की माणूस आपले ध्येय नक्कीच गाठतो हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. भंडारा जिल्ह्यातील लहानश्या नेरी या गावातील जयंत प्रल्हाद कारेमोरे याने आई वडिलांनी शिक्षणासाठी काढलेले कर्जाचे चीज या पोराने करून दाखविली आहे. जयंतने MPSC परीक्षेत बाजी मारली आहे.
काश्मीर फाईल चित्रपट
जरूर पहा : अमित शाह
अमित शाह म्हणाले की, “ज्यांनी काश्मीर फाईल चित्रपट पाहिला नाही त्यांनी हा चित्रपट जरूर पाहावा, जेणेकरून काँग्रेसच्या काळात काश्मीर किती दडपशाही आणि दहशतीखाली होते हे त्यांना कळेल. जेव्हा तुम्ही नरेंद्र भाई (नरेंद्र मोदी) यांना दुसऱ्यांदा पंतप्रधान केले तेव्हा त्यांनी ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हटवले. ज्या क्षणी नरेंद्रभाईंनी कलम हटवण्याचा निर्णय घेतला, त्या क्षणी देशभरातील लोकांना हे समजले की नरेंद्रभाईंसारख्या प्रबळ इच्छाशक्तीच्या नेत्याने देशाचे नेतृत्व केले तर काहीही अशक्य नाही.” अहमदाबाद महानगरपालिकेनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यवतमाळमध्ये धावत्या एसटी बसने घेतला पेट, संपूर्ण बस जळून खाक
यवतमाळ येथे धावत्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शिळोना-फोपाळी घाटात ही घटना घडली आहे. ही एसटी बस पुसद आगाराची असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. पुसद आगाराची ही बस नांदेड करिता जात असताना बसने अचानक पेट घेतला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘मला मुख्यमंत्र्यांची कुंडली पाहायची’; संजय राऊतांनाही दिले उत्तर!
‘मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कुंडली पाहायची आहे, काय भाग्यवान माणूस आहे. कशाचं सोयर सुतक नाही, काही काम नाही, पण त्याला कुणी हलवू शकत नाही’ असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसंच, काळ तुम्हाला दाखवून देतील तुम्ही कुणाची खिल्ली उडवता’ असं म्हणत संजय राऊत यांच्या रोखठोक सदरावरून राऊतांवर पलटवार केला. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले.
मदरशांमध्ये देशविरोधी गोष्टी
शिकवल्या जातात : रेणुकाचार्य
माध्यमांशी बोलताना रेणुकाचार्य यांनी मदरशांमध्ये देशविरोधी गोष्टी शिकवल्या जात असल्याचा आरोप केला आहे. “माझी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी मदरशांवर बंदी घालावी. हिंदू आणि ख्रिश्चन धर्मीय मुलं इतर शाळांमध्ये शिकतच आहेत. पण मदरशांमध्ये देशविरोधी गोष्टी शिकवल्या जातात. मदरशांवर बंदी घातली जावी किंवा त्यांना इतर शाळांमध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम शिकवण्याची सक्ती करावी”, असं रेणुकाचार्य म्हणाले आहेत.
मला वाटते की पुतिन
माझ्यापेक्षा श्रीमंत : एलोन मस्क
टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलोन मस्क हे त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. मस्क हे सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण त्यांच्या मते ते जगातले सर्वात श्रीमंत नाहीत. एलोन मस्क स्वतःला नाही, तर दुसऱ्या एका व्यक्तीला जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती मानतात. मस्क यांच्या मते, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आहेत. बिझनेस इनसाइडरला दिलेल्या मुलाखतीत मस्क यांनी ही माहिती दिली. मस्क यांना त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल विचारण्यात आले, त्यावर उत्तर देत ते म्हणाले की, “मला वाटते की पुतिन माझ्यापेक्षा श्रीमंत आहेत.
चित्तूर येथे बसचा अपघात
७ प्रवाशांचा मृत्यू, ४५ जण जखमी
आंध्रप्रदेशमधील चित्तूर येथे एका बसचा भीषण अपघात झाला. यात अपघातात ७ प्रवाशांचा मृत्यू झालाय, तर ४५ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात करण्यात आलं आहे. तिरुपतीपासून २५ किलोमीटर अंतरावर बकरापेट येथे ही घटना घडली.
कोहली पुन्हा चांगली कामगिरी
करू शकतो : सुनील गावस्कर
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार बदलल्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये विराट कोहलीचा खेळ २०१६ च्या हंगामाप्रमाणे दिसू शकतो, असा विश्वास गावस्कर यांनी व्यक्त केला आहे. IPL २०१६ मध्ये विराट कोहलीने ९०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. सुनील गावसकर म्हणाले, ‘कोहली पुन्हा कर्णधारपदाची धुरा सांभाळेल की नाही, हे सध्या आम्हाला माहीत नाही. पण कधीकधी जेव्हा एखादा खेळाडू कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त होतो तेव्हा तो इतर १० खेळाडूंचा विचार करत नसल्यामुळे चांगली कामगिरी करतो.
SD social media
9850 60 35 90