अकोट बाजार समितीमध्ये कापसाला 12 हजार रुपये भाव

गेल्या पन्नास वर्षांनंतर पांढऱ्या सोन्याला ऐतिहासिक दर मिळाला आहे. अकोला जिल्हातल्या अकोट बाजार समितीमध्ये कापसाला 12 हजार रुपये भाव मिळाला. हा भाव आतापर्यंतचा सर्वोच्च आहे. मात्र या भावाचा फायदा व्यापाऱ्याला की शेतकऱ्याला असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

बोंड अळी, निसर्गाची अवकृपा आदी कारणांमुळे गेल्या काही वर्षामध्ये राज्यात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. देशातील महाराष्ट्रसह अनेक राज्यात यावर्षी कापसाचे उत्पादन घटले आहे. मात्र यावर्षी कापसाला मिळत असलेला सर्वोच्च दर (highest rates) मिळाला. त्यामुळे येणाऱ्या काळ कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला राहू शकतो.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला चांगला दर मिळत आहे. त्यामुळं कापसाचे भाव दररोज तेजीकडे वाटचाल करत आहेत. पांढऱ्या सोन्याला ऐतिहासिक दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कापसाला सर्वोच्च भाव देणारी अकोट कृषी उत्पन्न बाजार ही ठरली आहे.

या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नांदेड, परभणी, वाशिम, बुलडाणा, अमरावती येथील शेतकरी या ठिकाणी आपला कापूस आणत आहेत. उत्पादन कमी झाल्यानं ही भाववाढ झाली आहे. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकरी थोड्याफार प्रमाणात सुखावला आहे. कापसावर रोग आल्यानं खऱ्या अर्थानं उत्पादन कमी झालं. याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. कापसाचं उत्पादन झाल नाही म्हणून तो रडत बसला होता. आता भाववाढ झाल्यानं कापूस उत्पादक आनंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.