अनिल परब यांच्या अडणची वाढणार, आयकर विभागाच्या धाडीत घबाड मिळाल्याचा दावा

शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडणची वाढल्याचं पाहायला मिळतंय. आयकर विभागानं 8 मार्च रोजी टाकलेल्या धाडीत मोठं घबाड मिळाल्याची माहिती आयकर विभागानं प्रेस नोटद्वारे दिलीय. त्यावरुन आता भाजप आमदार अतुल भातखळकर आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल परब आणि ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. इतकंच नाही तर अतुल भातखळकर यांनी या धाडीचा संबंध पश्चिम महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याशी असल्याचा दावा केलाय. दरम्यान, आयकर विभागाने दिलेल्या प्रेस नोटमध्ये एकप्रकारे अनिल परब यांच्याकडे अंगुलीनिर्देश असल्याचं पाहायला मिळत आहे.

आयकर विभागाने 8 मार्च रोजी मुंबईसह एकूण 26 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. या धाडी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित असल्याचं आता समोर येतंय. आयकर विभागाने दिलेल्या प्रेस नोटमध्ये मुंबई आणि महाराष्ट्रात 26 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. यात केबल ऑपरेटर, सरकारी अधिकारी आणि काही व्यावसायिकांचा समावेश होता.

चौकशीवेळी असं दिसून आलं की महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय नेत्याकडून 2017 मध्ये दापोलीतील एक भूखंड एक कोटी रुपयांत खरेदी करण्यात आला होता. मात्र, त्याची नोंदणी 2019 मध्ये करण्यात आली. त्यानंतर ही जमीन 1 कोटी 10 लाखाला एका अशा व्यक्तीला विकरण्यात आली ज्याच्या विरोधात 2020 मध्ये कारवाई करण्यात आली. मधल्या काळात या जमिनीवर 2017 थे 2020 या काळात रिसॉर्ट बांधणात आलं. त्या राजकारण्याच्या नावावर जमिनीची नोंदणी होईपर्यंत रिसॉर्टचे बांधकाम पूर्ण झालं होतं. पुढे 2020 मध्ये त्या राजकारण्याने त्या केबल ऑपरेटरला मालमत्ता विकली.

तोपर्यंत रिसॉर्ट जवळपास तयार झालं होतं. यावरुन रिसॉर्टच्या बांधकामाशी संबंधित बाबी नोंदणी अधिकाऱ्यांना कळवण्यात आली नव्हती. 2019 आणि 2020 मध्ये जमिनीच्या नोंदणीसाठी फक्त मुद्रांक शुल्क भरण्यात आलं. तसंच चौकशीवेळी मिळालेल्या पुराव्यांवरुन रिसॉर्टचे बांधकाम 2017 मध्येच सुरु झालं होतं. या बांधकामावर 6 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करण्यात आला होता. तसंच या बांधकामाचा खर्चाचा हिशेबही ठेवलेला नसल्याचं आयकर विभागानं सांगितलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.