मका पिकावर मर, मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव वाढला

रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये हरभऱ्याचे क्षेत्र विक्रमी वाढले आहे तर दुसरीकडे कडधान्यावर भर दिला आहे. शिवाय शेतजमिनीचा योग्य वापर आणि पाण्याचा सदउपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांनी मक्याची लागवड केली आहे. मराठवाड्यातील मकाचे अधिकचे उत्पादन घेतले जात आहे.

विशेषत: भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यांमध्ये पेरणीचा टक्का हा वाढलेला आहे. असे असले तरी वाढत्या वातावरणामुळे आता मका पिकावर मर आणि कोरडी मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे उत्पादनावर तर परिणाम होणार आहेच पण चारा पीक म्हणूनही त्याचा उपयोग होतो की नाही याबाबत शंका आहे.

ज्या जमिन क्षेत्रावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्या ठिकाणी 5 ट्रायकोडर्मा प्रति हेक्टरी 100 किलो शेणखतामध्ये मिसळून वापरावे लागणार आहे. मात्र, याचे प्रमाण वाढले तरी कोणताही विपरीत परिणाम न होता जैविक बुरशी अधिक परिणामकारक ठरते. मर रोगाचा प्रादुर्भाव दिसताच शेतामध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक 1 टक्का या प्रमाणात फवारावी किंवा ठिबकद्वारेही देता येणार आहे. जसे की कार्बेन्डसीम 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागणार आहे.

ज्वारीला पर्याय म्हणून समोर आलेले पीक म्हणजे मका. येथील पोषक वातावरणामुळे अपेक्षेपेक्षा अधिक उत्पादन आणि योग्य बाजारभाव मिळाल्याने क्षेत्र हे गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढले आहे. जिलह्यातील 5 तालुक्यांमध्ये विक्रमी उत्पादन घेतले जात आहे. मात्र, पीक जोमात असतानाच मकावर मर व कोरडी मूळकूज आढळून आली आहे. त्यामुळेच बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रातील संशोधकांनी या भागातील पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.