रशियाच्या विरोधात मतदान न केल्याने बांगलादेशला लस पाठवली नाही

भारतासह अनेक देशांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या मतदानात रशियन हल्ल्याचा निषेध करणाऱ्या ठरावापासून स्वतःला दूर केले. बांग्लादेशनेही या मतदानात भाग घेतला नाही. आता युक्रेनबाबतच्या भूमिकेमुळे बांगलादेशला मोठी किंमत मोजावी लागत आहे. कोरोनाने अनेक देशांचे कंबरडे मोडले आहे. तसेच अनेक देशातून कोरोना गेला नसल्याचं चित्र आहे. जगातील आठव्या क्रमांकाचा लोकसंख्येचा देश असलेल्या बांग्लादेशलाही इतर देशांप्रमाणेच कोविडचा फटका बसला आहे. रशियाच्या विरोधात संयुक्त राष्ट्रांमध्ये मतदान न झाल्यामुळे बांगलादेशला पाठवलेल्या कोविड-19 लसीची मोठी खेप थांबवण्यात आली आहे. बांगलादेशने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत रशियाविरुद्धच्या प्रस्तावावर मतदान करण्यापासून दूर राहिल्यावर लिथुआनियाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

लिथुआनिया नॅशनल रेडिओ अँड टेलिव्हिजन (LRT) च्या अहवालानुसार, लिथुआनिया एका आठवड्यापूर्वी बांगलादेशला COVID-19 लसीचे चार लाख 40 हजार लसीचे डोस पाठवणार होते. परंतु बांगलादेशने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत रशियाविरुद्धच्या प्रस्तावावर मतदान करण्यापासून दूर राहिल्यावर, लिथुआनियाने आपला जुना निर्णय मागे घेतला आणि बांगलादेशला ही लस देण्यास नकार दिला. लिथुआनियाचे पंतप्रधान इंग्रिडा सिमोनेती यांच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती जाहीर केली आहे. त्यामुळे बांग्लादेशला आता इतर देशांकडून कोरोनाचे डोस घ्यावे लागतील. रशियाने युक्रेनवरती आक्रमण केल्यानंतर अनेक देशांनी रशियावरती टीका केली होती. तसेच युद्ध थांबण्यासाठी चारही बाजूने प्रयत्न केले होते. रशियाने इतका भ्याड हल्ला केला आहे की, अनेक नागरिकांनी तिथून इतर देशात स्थलांतर केलं आहे.

संयुक्त राष्ट्र महासभेने युक्रेनवरील रशियन हल्ल्याचा निषेध करणाऱ्या ठरावावर मतदान केले. रशियाने युक्रेनवरील लष्करी कारवाई त्वरित थांबवावी, असं अनेक देशाचं मत होतं. प्रस्तावाच्या समर्थनार्थ 141 तर पाच देशांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. त्यावेळी बांग्लादेशने देखील रशियाच्या विरोधात मतदान करणे टाळले. त्यामुळे लिथुआनियाने कोरोना लसीची दुसरी डिलीव्हरी रद्द केली आहे. लिथुआनिया

ने रशियाच्या विरोधात मतदान केले आहे. तसेच बांग्लादेशने देखील रशियाच्या विरोधात मतदान करावं अशी लिथुआनियानाला अपेक्षा होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.