दिल्लीच्या पालम भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या परिसरात एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये दोन बहिणी, त्यांचे वडिल आणि आजीचा समावेश आहे. या कुटुंबियांचे मृतदेह पोलिसांना रक्ताच्या थारोळ्यात आज सकाळी आढळून आले आहेत.
अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तीनेच त्याचे कुटुंब संपवल्याचे समोर आले आहे. या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीच्या दक्षिण-पश्चिम भागात घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर दोघांचे मृतदेह बाथरुममध्ये आढळून आले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास सुरू आहे.