मिथुन चक्रवर्ती आणि हेमा मालिनी हे दोघेही बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोठे स्टार आहेत. त्या दोघांनी एकत्र आणि एकट्याने देखील इंडस्ट्रीमध्ये नाव मिळवलं आहे. आता हे दोन्ही स्टार्स बॉलिवूडपासून लांब आहेत. परंतु ते टेलिव्हिजीन शो आणि देशाच्या पॉलिटीक्समध्ये सक्रीय आहेत. आता ते दोघे टीव्ही रिऍलिटी शो हुनरबाजच्या मंचावर एकत्र दिसणार आहेत. या शोशी संबंधित एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन्ही स्टार्स 90 च्या दशकातील लोकप्रिय गाणं ‘ड्रीम गर्ल’ किसी शायर की गझल’वर डान्स करताना दिसत आहेत.
परंतु आता एकत्र काम करण्यासाठी तयार झालेले मिथून आणि हेमा मालिनी आधी एकमेकांचं तोंड देखील पाहायचे नाहीत आणि त्यांनी एकमेकांपासून दुरावा धरला. परंतु त्यांनी असं करण्यामागचं कारण काय आहे? हे फारच कमी लोकांना माहित आहे. तर आज आम्ही तुम्हाला तो किस्सा सांगणार आहोत, ज्यामुळे या दोघांनी एकमेकांसोबत बोलनं देखील बंद केलं.
मिथून आणि हेमा मालिनी यांनी 1989 मध्ये ‘गलियों का बादशाह’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. या चित्रपटामध्ये हेमा मालिनीने मिथुनसोबत अनेक बोल्ड सीन्स दिले होते, मात्र नंतर ते चित्रपटातून वगळण्यात आले, ज्यामुळे हेमा खूप संतापल्या.
मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यावेळेला मिथुन यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकाला सांगितले होते की, त्याचे सीन्स हेमा मालिनीपेक्षा जास्त ठेवावेत. ज्यामुळे हेमा यांचे काही दृश्ये चित्रपटातून काढून टाकण्यात आले. मात्र, हेमा यांना जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा त्या फारच संतापल्या.
चित्रपटात जर तुम्हा हे सीन्स ठेवायचे नव्हते, तर मग ते शूट का करण्यात आले? असा प्रश्न विचारत हेमा मालिने मिथून आणि दिग्दर्शक दोघांवर चिडल्या होल्या. त्यावेळेला हेमा मालिनी आणि मिथून यांच्यामध्ये जोरदार भांडण झालं, ज्यानंतर दोघांनी एकमेकांशी अबोला धरला. परंतु आता वेळेनुसार त्यांच्यामधील जखमा भरून निघाल्या. ज्यानंतर आता इतक्या वर्षानंतर दोघेही एकत्र काम करायला तयार झाले आहेत