नाशिकमध्ये मराठी भाषा भवन उभारणार

नाशिक जिल्ह्याला क्रीडा संस्कृतीचा वारसा आहे. त्यामुळे शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारात क्रिकेट, फुटबॉल खेळांच्या सरावासाठी मैदानाची तरतूद करून तसा प्रस्ताव सादर केल्यास शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासनही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिले.

सामनगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र व शासकीय तंत्रनिकेतनबाबतच्या आयोजित आढावा बैठकीत मंत्री सामंत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल पवार, पुणे विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. किरण बोंदर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, नाशिक उपकेंद्राचे समन्वयक डॉ. किरणकुमार टोपे, अहमदनगर उपकेंद्राचे संचालक डॉ. एन. आर. सोमवंशी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे रजिष्टार बोंडे आदी उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन व मुक्त विद्यापीठाच्या समन्वयाने घेण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिक दृष्ट्या देशातील अग्रेसर राज्य आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याकरिता राज्य शासनामार्फत आवश्यक सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

विद्यापीठांतर्गत असणारे महाविद्यालये व शासकीय तंत्रनिकेतनमध्ये माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात यावे. यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास महिला बचत गट, महिला मंडळ व स्वयंरोजगार संस्था यांना प्राधन्य देण्यात यावे. शासकीय तंत्रनिकेतनचा विकास करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचे प्रस्ताव सादर करावे. नाशिक जिल्ह्याला क्रीडा संस्कृतीचा वारसा आहे. त्यामुळे शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारात क्रिकेट, फुटबॉल खेळांच्या सरावासाठी मैदानाची तरतूद करून तसा प्रस्ताव सादर केल्यास शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासनही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.