विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी शरद पवार यांचा पुढाकार

युक्रेमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी युद्धात अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी केद्र सरकारनेही हलचाली वाढवल्या आहेत. काही विद्यार्थ्यांना सुखरूप भारतात आणण्यात यश आले आहे. मात्र काही विद्यार्थी अजूनही अडकून पडले आहेत. दुपारीच कर्नाटकातील एका विद्यार्थ्याचा रशियाच्या गोळीबारात मृत्यू झालाय. तर भारतानेही युक्रेनमधील विद्यार्थ्यांना मोठा अलर्ट दिला आहे. या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. या विद्यार्थ्यांना परत आणण्याासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना फोन केला असल्याची माहिती राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. फोनवरून शरद पवारांनी माहिती घेतली, तसेच महाराष्ट्रीयन आणि भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणा अशा सूचनाही दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे की प्लीज कृती करा. आपली मुलं अडकली आहेत त्यांना परत आणा. दुर्दैवाने आपलं एक मुलं गमावलं आहे, आता राजकारण न करता प्रसिद्धी न करता त्यांना लवकरात लवकर आणा, अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली आहे. तसेच एकदा का मुलं परत आली की काय प्रसिद्धी करायची ती करा. असेही त्या म्हणाल्या आहेत.

याबाबत जयंत पाटील यांनीहीह प्रतिक्रिया दिली आहे. अनेक पालक आणि मुलांशी बोलणं सुरू आहे, दुर्दैवाने एकाचा मृत्यू झाला, केंद्र सरकारने उशिर केला, केंद्र सरकारने जास्त लक्ष दिलं पाहिजे, असे जयंत पाटील म्हणाले आहेत. तसेच तिथल्या नागरिकांचे समाधान झालं नाही, याचा अर्थ आपण कमी पडतो, अशी टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली आहे. दुपारी नवीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानंतर केंद्र सरकारच्या गोटातील हलचालीही वाढल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी युक्रेनमधील विद्यार्थ्यांना कसे बाहेर काढता येईल यासाठी दिल्लीत आज पुन्हा तातडीची बैठक घेतली आहे. कालही अशीच बैठक घेतली होती. युक्रेमधील काही शहरातून लोकांनी लवकरात लवकर बाहेर पडावे, असा अलर्ट केंद्राने आधीच दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.