आज अभिनेत्री पल्लवी जोशी यांचा वाढदिवस

पल्लवी जोशी यांनी लहान वयात रंगमंचात काम करणं सुरु केले. त्यांनी बाल कलाकार म्हणून बदला आणि आदमी सडक का नावाचे दोन चित्रपटात अभिनय केला होता. त्यांनी १९७९ साली आलेल्या झालेल्या दादा ह्या चित्रपटात एक कुविख्यात गुंडाला सुधारणारी एका अंध मुलीच्या भूमिका साकारली होती. १९८० आणि १९९० च्या काळात त्यांनी काही आर्ट फिल्म मध्ये काम केली ज्या मध्ये रुक्मावती की हवेली, सुरज का सातवा घोडा, तृषाग्नी, वंचित आणि रिहाई प्रमुख होता. त्यांनी व्यावसायिक मोठ्या बजेटची चित्रपटात बहिण किवा हिरोईनची मैत्रीण सारखे सहकारी भूमिकेत देखील अभिनय केली होती ज्यात सौदागर, पनाह, तहलका आणि मुजरीम हे चित्रपट प्रमुख होता. पल्लवी जोशी यांनी ‘मेरी आवाज ही पहचान है’ या मालिकेत काम केले आहे. एखादा अपवाद वगळता नेहमी हिंदीत रमणारी पल्लवी जोशी मराठीतून “सा रे ग म’ करू लागल्या, तेव्हा समस्त मराठी रसिकांना तो सुखद धक्का होता. त्यांचे निवेदन, टाळ्या वाजविण्यासाठीचे आवाहन अल्पावधीतच लोकप्रिय झाले. हिंदीतील “अंताक्षरी’ही त्यांनी केली. “रिटा’ हा मराठी चित्रपट त्यांनी केला आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या “बुद्धा इन ट्रॅफिक जॅम’ या चित्रपटात ती अनुपम खेर यांच्या पत्नीची भूमिका केली होती. “सौदागर’, “तेहलका’ मध्ये त्यांनी छोट्या भूमिका केल्या. श्याभम बेनेगल यांच्या “मेकिंग ऑफ महात्मा’ मध्येही त्यांनी काम केले होते. “वो छोकरी’साठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. टीव्हीवरही “जुस्तजू’, “अल्पविराम’ या त्यांच्या मालिका खूप गाजल्या. आपल्या समुहाकडून पल्लवी जोशी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.

संजीव वेलणकर ,पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.