अभिनेता जॉन अब्राहम आता वेगवेगळ्या अॅक्शन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावर्षी प्रदर्शित होणारा त्याचा अटॅक हा चित्रपटही खूप चर्चेत आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर प्रेषकांच्या पसंदीला पडला होता. त्यामुळे तो आता वेगवेगळ्या अवतारात प्रेषकांच्या भेटीला येत आहे. अटॅक या सिनेमाची चर्चा चालू असतानाच जॉन अब्राहमने आणखी एक जोरदार धक्का दिला आहे. जॉनने आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून आपल्या नव्या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्या चित्रपटाचे नाव तेहरान असून हा अॅक्शनपट असल्याचे त्याने सांगितले आहे.
अभिनेता जॉन अब्राहम याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या आगामी तेहरान या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. जॉन अब्राहमने हे पोस्टर शेअर करत असतानाच त्यांनी आणखी एक माहिती दिली आहे ती ही की या धमाकेदार चित्रपटात एका अॅक्शन हिरोच्या भूमिकेत तो दिसणार आहे.
हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून या अॅक्शनपटात तो आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांबरोबर लढताना दिसत आहे. हा चित्रपट पूर्णतः अॅक्शनपट असल्याचे जॉननेच आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. या अॅक्शनपटाचे पोस्टर त्याने शेअर करताना कॅप्शन दिले होते की, अॅक्शन पॅक्ड रिपब्लिक डे 2023 साठी तयार राहा असे त्याने म्हटले आहे. या चित्रपटाबद्दल मी प्रचंड आशावादी असून या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण गोपालन यांनी केले आहे, तर दिनेश विजान, शोभना यादव आणि संदीप लेजेल यांनी निर्मिती केली आहे, आणि रितेश शहा आणि आशिष पी वर्मा यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.
जॉन सध्या अॅक्शनपट आहे आणि आता तो त्यातील उस्ताद आहे, प्रेषकही त्याला अशाच आणि याच भूमिकेत बघायला त्यांना आवडतं. तर 1 एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा त्याचा अटॅक ही सिनेमाही अॅक्शन थ्रिलर आहे. यामध्ये त्याच्या सोबत जॅकलीन फर्नांडिस आणि रकुलप्रीत आहेत. याआधीही त्याचा सत्यमेव जयते 2 मध्ये तो सगळ्यांच्या पसंदीला उतरला होता. त्यामध्ये त्याचा ट्रिपल रोल होता आणि त्याचा तोही सिनेमा अॅक्शनपटच होता. मात्र त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर असं काही खास कमाई केली नव्हती.