मध्य प्रदेशही पूर्ण निर्बंधमुक्त, महाराष्ट्र कधी होणार

कोरोनाने जगाला हैराण करून सोडले आहे. कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट अशा अनेक लाटा जगाने पाहिल्या आहे. तिसऱ्या लाटेपेक्षा पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेदना अत्यंत भयंकर आहेत. कित्येक दिवस लोकांना लॉकाडाऊनमुळे घरात बसून राहवं लागलं आहे. आपले अनेक दिवस कोणत्या ना कोणत्या निर्बंधात गेले आहेत. मात्र आता कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने पुन्हा देश निर्बंधमुक्त होत निघाला आहे. अलीकडेच गोव्यातील लसीकरण शंभर टक्के पूर्ण झालं आहे. तर आता मध्य प्रदेशही पूर्ण निर्बंधमुक्त झाले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग एवढेच नियम लागू असणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी दिली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रातही लवकरच निर्बंध हटवले जाण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात टास्क फोर्सशी बैठक घेऊन पुढील निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येईल असे महाविकास आघाडीतील मंत्र्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे लवकच महाराष्ट्र्रालाही दिलासा मिळाण्याची शक्यता आहे. मात्र मास्क काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट केले आहे. कोरोना अजून संपलेला नाही. मास्क कधी काढणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. मास्क काढण्याबाबतचे आताच काही सांगता येत नाही. आता आपल्याला हा जो काळ मिळाला तो लसीकरण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे लसीकरणावर भर द्या, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला अजून काही काळ तरी मास्क वापरणं बंधनकारक राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच मास्क काढण्याबाबतच्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.

महाराष्ट्रातही लसीकरणाचा टक्का अतिशय चांगला आहे. मात्र अद्याप शंभर टक्के लसीकरण पूर्ण झालेले नाही. महाराष्ट्रतील शाळा पुन्हा सुरू झाल्याने शासन विद्यार्थ्याचेही लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्यावर भर देत आहे. लोकांनीही जागृतने चांगला प्रतिसाद दिल्यास महाराष्ट्रही लवकरच शंभर टक्के लसीकरण पूर्ण करेल, असा विश्वास आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. जेवढ्या लवकर लसीकरण पूर्ण होईल, तेवढ्या लवकर परिस्थिती अधिक सुधारत जाणार आहे. त्यामुळे निर्बंधातून मुक्तता हवी असेल तर महाराष्ट्रानेही लसीकरणावर भर देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.