पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गाचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मोदींनी विविध रेल्वे प्रकल्पावर भाष्य केलं आहे. पंतप्रधान मोदींच्या भाषणात यावेळी मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेचा उल्लेख आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी केल्या या उल्लेखामुळे हा हायस्पीड रेल्वेचा मुद्दा पुन्हा तपाण्याची शक्यता आहे. या बुलेट ट्रेनला आधीपासून अनेक राजकीय पक्षांनी आणि शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही याविरोधात भूमिका मांडली आहे. तर शरद पवार यांनीही या मार्गाला विरोध केला आहे. महाराष्ट्रातील लोकांना याचा फायदा कमी तर गुजरातमधील लोकांना याचा जास्त फायदा होईल असे अनेकांचे मत आहे. त्यामुळे या हायस्पीड रेल्वेला महाराष्ट्रातून विरोध झाला आहे. रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीसाठी हजारो कोटींची गुंतवणूक केली जात आहे.रेल्वेचं आधुनिकीकरण केलं जात आहे. मुंबई उपनगर रेल्वेची क्षमता वाढवायची आहे. 400 किलोमीटरचा विस्तार करायचा आहे. 19 स्टेशनांचं आधुनिककरण करणार आहोत. मुंबईतच नव्हे तर इतर राज्याशीही मुंबईच्या कनेक्टिव्हिटीत स्पीड आणि आधुनिकतेची गरज आहे. सध्या मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेची गरज आहे, असे मोदी म्हणाले आहेत.
तसेच ही लोकल सुरू झाल्यास मुंबईची ओळख द्विगुणीत होईल.हा प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावा ही आमची प्राथमिकता आहे, असंही त्यांनी सांगितलं.तसेच 34 ठिकाणी नव्या रेल्वेलाईनला जुन्या रेल्वे लाईनला जोडायचं होतं. आपण हा प्रकल्प पूर्ण केला. पूल बनवले. भुयार बनवले. राष्ट्र निर्माण करण्यासाठी अशा कमिटमेंटला मी नमन करतो. मुंबई महानगरात स्वतंत्र भारताच्या प्रगतीत मोठं योगदान दिलं आहे. आता आत्मनिर्भर भारतातही मुंबईचं योगदान मिळेल.रेल्वे कनेक्टिव्हची गोष्ट केली तर त्यात हजारो कोटींची गुंतवणूक केली जात आहे. आता मुंबई सबर्बनची क्षमता आता त्यात 400 किलोमीटरचा विस्तार करायचा आहे.असेही मोदींनी यावेळी सांगितलं आहे.
तसेच जेवढे लोक भारतीय लोक रेल्वेतून प्रवास करतात तेवढी काही देशांची लोकसंख्याही नाही. भारतीय लोकलला सुरक्षित आणि आधुनिक बनवणं हे आपल्या सरकारचं प्राधान्य आहे. 8 हजार रेल्वे लाईनचं इलेक्ट्रिककरण केलं आहे. साडेचार हजार किलोमीटरमध्ये नव्या लाईन तयार केल्या आहेत किंवा आधुनिककरण केलं आहे. येत्या काळात 400 नव्या वंदे भारत सेवेत दाखल होतील.स्टेशनवर वायफाय आहे. वंदे भारत ट्रेन भारतीय फॅक्टरींनी बनवल्या त्यामुळे देशाचा विकास होत आहे. विदेशीपासून मुक्ती आणि स्वदेशी कडून काम केले पाहिजे.गरीब आणि नवीन पिढीला हाताला काम मिळाले पाहिजे, असे मतही यावेळी मोदींनी मांडले आहे.