अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर शनिवारी लगीनगाठ बांधणार

चंदेरी दुनियेतील आणखी जोडी विवाहबंधनात अडकत आहेत. बॉविवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर शनिवारी लगीनगाठ बांधत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रीय रिती-रिवाजानुसार हा विवाह पार पडणार आहे. बॉलिवूड रिपोर्टनुसार 19 फेब्रुवारी रोजी फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर फरहानच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर सात फेरे घेत साताजन्माची गाठ बांधणार आहेत. या विवाह सोहळ्यात फरहान आणि शिबानी यांचे जवळचे मित्र आणि नातेवाईक सहभागी होणार आहेत. फरहान अख्तरची आई हनी ईरानी यांनी ही माहिती दिली आहे.

हनी ईरानींनी दिली महाराष्ट्रीय विवाहाची माहिती
फरहान आणि शिबानी गेल्या चार वर्षापासून रिलेशनशीपमध्ये आहेत. यानंतर त्यांनी आपले नाते अधिकच घट्ट करण्यासाठी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नाच्या आधीच्या रिती-रिवाजांना सुरुवात झाली असून आज 17 फेब्रुवारी रोजी शिबानीच्या वांद्रे स्थित घरामध्ये मेहंदी सेरेमनी पार पडली. या सेरेमनीमध्ये जवळच्या मित्र परिवाराला आमंत्रित करण्यात आले होते. यासाठी घरीच सर्व तयारी करण्यात आली होती. या विवाहामुळे आपण सर्व जण खूप खूश असल्याचे हनी ईरानी म्हणाल्या.

लग्नाची तयारीही जोरदार करण्यात आली असून 19 फेब्रुवारी रोजी बहुचर्चित विवाह संपन्न होईल. हा विवाह खाजगी पद्धतीने पार परडणार आहे. मीडियाने विवाहाला उपस्थित राहून फोटो काढू नये म्हणून हा विवाहाबाबत अधिक माहिती देत नसल्याचे हनी ईरानी यांनी स्पष्ट केले. आज तकने दिलेल्याम माहितीनुसार, लग्नासाठी 18 फेब्रुवारी रोजी फरहान आणि शिबानीचे कुटुंबीय विवाहस्थळी दाखल होतील. 19 फेब्रुवारी रोजी पारंपरिक विवाह पार पडल्यानंतर 21 फेब्रुवारी सिविल सेरेमनीमध्ये लग्न होईल.

फरहान आणि शिबानीची ओळख एका रिअॅलिटी शो दरम्यान झाली होती. वर्ष 2015 मध्ये ‘I Can Do That’ हा रिअॅलिटी शो टीव्हीवर सुरु होता. या शो मध्ये फरहान होस्ट होता तर शिबानी कंटेस्टंट होती. या शो दरम्यान त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर 2018 मध्ये दोघांनी आपल्या रिलेशीपवर शिक्कामोर्तब केला. सोशल मीडियावरही दोघांचे एकत्र फोटो शेअर करु लागले. फरहानचे हे दुसरे लग्न आहे. अधुना भबानीसोबत 16 वर्ष संसार केल्यानंतर दोघांनी 2017 मध्ये आपल्या वैवाहिक आयु्ष्याला पूर्णविराम दिला. त्यानंतर फरहानने मुव्ह ऑन करत शिबानीसोबत नाते जोडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.