हिजाब प्रकरणातून अचानक प्रकाशझोतात आलेली कर्नाटकची विद्यार्थीनी ‘मुस्कान खान’ हिचे नाव मालेगावातील उर्दू घराला देण्याच्या एैतिहासिक निर्णयावर मालेगावात बुहमताने शिक्कामोर्तब करण्यात आला. मालेगाव मनपाची महासभा सभागृहात घेण्यात आली, यावेळी महापौर यांनी उर्दू घराला मुस्कान खानचे नाव देण्याचा विषय मांडला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी मुस्कान खानच्या नावाला समर्थन दिल्याने मुस्कान खानच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. मुस्कान खान हिच्या हिजाब प्रकरणावरून देशभर विविध संघटनांनी मोर्चे निवेदने दिल्याने मुस्कान खान चर्चेत आली होती.
कर्नाटकची विद्यार्थीनी ‘मुस्कान खान’ हिचे नाव मालेगावातील उर्दू घराला देण्याच्या एैतिहासिक निर्णयाला शिवसेना भाजपा, गटबंधनच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी मुस्कान खानच्या नावाला समर्थन दिल्याने मुस्कान खानच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. दरम्यान या नामकरणाला जनता दलाच्या नगरसेवकांनी विरोध करीत ऑनलाईन महासभेत गोंधळ घालता. त्यामुळे महासभा चालू असताना वातावरण काही काळ तंग बनले होते. दरम्यान बहुमताने मुस्कान खान नामकरणावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने संपूर्ण राज्यभरात मालेगाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
कर्नाटकातील घटनेचे तीव्र पडसाद पहिल्या दिवसापासून मालेगावात दिसून आले. हिजाबच्या समर्थनार्थ मालेगावामध्ये ‘हिजाब दिवस’ पाळण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी हिजाब दिवसाला परवानगी नाकारून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हिजाबच्या समर्थनार्थ जमेत ए उलमातर्फे मालेगावमध्येच आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माइल यांनी बैठक घेऊन हिजाब दिवस पाळण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी महिला मेळावा घेऊन व शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते. यावेळी परवानगी नाकारूनही आयोजकांनी महिला मेळावा घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यावेळी राष्ट्रवादीनेही आंदोलन केले होते, त्यामुळे त्यांच्याविरोधातही आयोजकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तरीही मालेगाव मनपाची महासभा सभागृहात घेऊन त्याला समर्थन देऊन मुस्कान खानचे नाव देण्यात आले.