आज दि.७ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

किरीट सोमय्या दोन, तीन महिने उठला
नाही पाहिजे असा मार देण्याचा कट होता

शारिरीक इजा फार झालेली नाही पण उद्धव ठाकरे आणि शिवसेना अशाप्रकारे कट कारस्थान करतं. अमिताभ गुप्ता हे तेच पोलीस आयुक्त आहेत ज्यांनी राकेश वाधवानला पळवून लावलं होतं. सगळे व्हिडीओ पाहिल्यानंतर आणि सीआयएसएफच्या अहवालतही पुणे पोलीस, महापालिकेतील सुरक्षा कर्मचारी आणि शिवसेना हायकमांडने मिळून रितसर कट रचला असल्याचं समोर आलं आहे. किरीट सोमय्या दोन, तीन महिने उठला नाही पाहिजे असा मार देण्याचा कट होता,” असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

शांतिश्री धुलीपुडी, जेएनयूच्या
१३ व्या कुलगुरू होणार

प्राध्यापिका शांतिश्री धुलीपुडी पंडित यांची देशातील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) नवीन कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शांतिश्री धुलीपुडी पंडित या जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू असतील. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. याआधी त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक होत्या. शांतिश्री धुलीपुडी, या जेएनयूच्या १३ व्या कुलगुरू होणार आहेत.

आदित्यनाथ यांच्यासह भाजपाच्या
नेत्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. लेडी डॉन नावाने बनवलेल्या ट्विटर अकाऊंटवर भाजपाच्या सर्व नेत्यांची वाहने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. हापूर पोलिसांनाही टॅग करण्यात आले आहे. मेरठ पोलिसांनी ट्विटरला पत्र लिहून लेडी डॉन ग्रुपची माहिती मागितली आहे.

नितेश राणेंचा कोठडीमधील मुक्काम वाढला,
गोट्या सावंत यांचा जामीन अर्ज फेटाळला

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या दुखवट्याच्या सुट्टीमुळे एक दिवसांनी पुढे गेली आहे. ही सुनावणी उद्या म्हणजेच मंगळवारी होणार आहे. यामुळे राणेंचा कोठडीमधील मुक्काम वाढण्याबरोबरच त्यांना छातीत दुखू लागल्याने कोल्हापूरला हलवण्यात आलं आहे. अशातच आता राणे कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा जामीन अर्ज आज फेटाळला.

पोलिसांनी डीजे बंद केल्याने जमावाची
पोलीस ठाण्यात तोडफोड

बुलढाण्यात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलीस स्थानकावरच हल्ला करण्यात आला आहे. जमावाने शेगाव पोलीस ठाण्यात घुसून तोडफोड केली आहे. मध्यरात्री जमावाने थेट पोलीस स्थानकात घुसून तोडफोड करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. शेगाव पोलिसांना मध्यरात्री एकच्या सुमारास वाढदिवसाच्या पार्टीत डीजे सुरु असल्याची तक्रार प्राप्त झाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि डीजे बंद करायला लावला.

गुरमीत राम रहीमला तीन
आठवड्यांसाठी रजा मंजूर

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सध्या रोहतकच्या सुनारिया तुरुंगात आपल्या दोन महिला शिष्यांवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा भोगतोय. दरम्यान, त्याला सोमवारी तीन आठवड्यांसाठी फरलो मंजूर करण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तुरुंगातील एका अधिकाऱ्याने राम रहीमची पुढील तीन आठवड्यांसाठी सुटका झाल्याची पुष्टी केली. या काळात डेरा प्रमुखाला त्याच्या गुरुग्राम येथील फार्महाऊसवर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्याला सिरसा येथे जाऊ दिले जाणार नाही.

पाकिस्तानातील राजकीय नेत्यांनी
लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली

पाकिस्तानातील अनेक राजकीय नेत्यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. दीदींचं जाणं हा “एका युगाचा अंत” असं त्यांनी म्हटलंय. “लतादीदी या दशकानू दशके संगीत जगतावर राज्य करणारी एक गानसम्राज्ञी होत्या,” असं त्यांनी म्हटलंय.

लतादिदींवर शोकाकूल
वातावरणात अंत्यसंस्कार

लतादिदींवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादिदींच्या जाण्याने देशाचा सूर हरपला आहे. सारा देश हळहळ व्यक्त करत आहे. देशाचे पंतप्रधान मोदी उपस्थित लावत आदरांजली वाहिली. दिदींना निरोप देण्यासाठी अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे असे मोठे नेतेही उपस्थित होते. त्याचबोरबर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील सुभाष देसाई हे मंत्रीही अंत्यस्काराला आलेले दिसून आले.

स्पुतनिक लाइट लसीचा एक डोस
कोरोनाचा प्रतिकार करणार

देशात सध्या सुरू असलेल्या कोरोनाविरुद्ध लसीकरण मोहिमेला आणखी बळकटी मिळणार आहे. महामारीविरोधातील लढ्यात भारताला आणखी एका लसीचे सामर्थ्य लाभले आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने केवळ एक डोस पुरेसा असलेल्या स्पुतनिक लाइट या कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. डीसीजीआयच्या तज्ज्ञांच्या समितीने या लसीचा भारतात आपत्कालीन वापर करण्याबाबत शिफारस केली होती. त्याला अनुसरून मंजुरी दिली आहे.

बंगालमध्ये 15 दिवस सार्वजनिक
ठिकाणी लतादीदींची गाणी वाजणार

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन झाल्याने केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. पश्चिम बंगाल (west bengal) सरकारनेही दुखवटा म्हणून उद्या सोमवारी अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. तसेच उद्यापासून 15 दिवस राज्यातील सर्व सरकारी ठिकाणे, सरकारी कार्यालये आणि ट्रॅफिक सिग्नलवर लता मंगेशकर यांचीच गाणी वाजवण्याचे आदेश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत. लतादीदींना श्रद्धांजली म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पश्चिम बंगाल सरकारने दिली आहे.

IndiaMART कर्मचाऱ्यांना
आठवड्याला पगार देणारी कंपनी

B2B ई-कॉमर्स कंपनी IndiaMART च्या कर्मचाऱ्यांना आता पगारासाठी महिन्याच्या शेवटच्या दिवसाची वाट पाहावी लागणार नाही. कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना दर आठवड्याला पगार देणारे नवीन साप्ताहिक वेतन धोरण जाहीर केले आहे. कंपनीने आपल्या फेसबुक पेजवर ही माहिती दिली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यामुळे कर्मचाऱ्यांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल. ते अधिक चांगले काम करण्यास प्रवृत्त होतील.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.