शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची दादागिरी खपवून घेणार नाही : रक्षा खडसे

रावेरच्या भाजप खासदार रक्षा खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे पत्रकार परिषद घेतली. रक्षा खडसे यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडी सरकारचा कारभार, भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांना झालेली धक्काबुक्की, एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी या मुद्यांवर भाष्य केलं. शिवसैनिकांच्याकडून भाजप नेते किरीट सोमय्यांना झालेल्या धक्काबुक्कीवरुन रक्षा खडसे आक्रमक झाल्याचं दिसून आलं. महाराष्ट्रात सध्या चुकीचं राजकारण सुरु आहे.

किरीट सोमय्या यांना पुण्यात ज्या प्रकार खाली पडून त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला तो चुकीचा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांचे कार्यकर्ते दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची दादागिरी खपवून घेणार नाही
खासदार रक्षा खडसे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रात सध्या अत्यंत चुकीचे राजकारण सुरू आहे. एखाद्या आरटीआय कार्यकर्त्याला भ्रष्टाचाराची माहिती काढणे हा अधिकार आहे. मात्र, किरीट सोमय्या यांना पुण्यामध्ये ज्याप्रकारे खाली पाडून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला ते चुकीचे आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नेते आहे आणि त्यांचे कार्यकर्ते जर अशा प्रकारे कृत्य करत असतील तर ते योग्य नाही. मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्तेही राज्यात दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे मुळीच खपवून घेतलं जाणार नाही, अशा इशारा खासदार रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.

महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न हा एसटी महामंडळ बंद होऊन खाजगीकरण कसे करता येईल यासाठी आहे. सरकारचा फायदा कसा होईल यासाठी महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न सुरू आहे, असं रक्षा खडसे म्हणाल्या.
जेव्हा राज्य सरकारला टॅक्स कमी करण्याची वेळ येते त्यावेळेस जनतेचा विचार केला जात नाही उलट वाईनला परवानगी दिली जाते, असा आरोप देखील रक्षा खडसे यांनी केला. खरोखर जनतेविषयी महाविकास आघाडी सरकारला चिंता आहे तर केंद्र सरकार एक पाऊल मागे घेतले तर राज्य सरकारने घेऊन वरील टॅक्स कमी करावा. कर कमी न करता कोरोनाच्या काळातही वाईन ला परवानगी देण्यात येते हे चुकीचे असल्याचा आरोप खडसे यांनी केला. राज्यात दारूबंदीसाठी महिला आंदोलन करत आहे मात्र राज्य सरकार दारू विक्रीला परवानगी देत असेल तर हे चुकीचे आहे, असही रक्षा खडसे यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.