तर मुंबईतील लोकल सेवा बंद करावी लागेल : महापौर

देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील कोरोना परिस्थिती चिंताजनक झाली आहे. मुंबईत काल दिवसभरामध्ये जवळपास साडे आठ हजार रुग्ण आढळले आहेत. ही परिस्थिती सांभाळण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी निर्बंध लावण्याचे संकेत दिले आहेत. नागरिकांनी काळजी घेतली नाही तर मुंबईतील लोकल सेवा बंद करावी लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

कोरोना संक्रमणाचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी काही कडक निर्बंध लागू केले जाऊ शकतात, असं महापौरांनी म्हटलं आहे. रेस्तराँ ५० टक्के क्षमतेनं सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याचबरोबर लोक जर योग्य प्रतिसाद देत नसतील, तर धार्मिक प्रार्थनास्थळेही बंद करण्यात येतील,” असं महापौर म्हणाल्या.

“मुंबईतील लोकल प्रवासावरही निर्बंध आणले जाऊ शकतात. पूर्वीप्रमाणेच फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासासाची मूभा दिली जाऊ शकते. त्याचबरोबर लोकांकडून करोना नियमावलीचं पालन केलं जात नसल्यानं मॉल्स आणि थिअटर बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो,” असंही महापौर पेडणेकर यांनी यांनी सांगितलं. नव्या निर्बंधासंदर्भात २ एप्रिल रोजी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे मुंबईतील चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. मुंबईत एकूण बाधितांची संख्या चार लाख २३ हजार ३६० झाली आहे. एका दिवसात ५,०३१ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत तीन लाख ५५ हजार ६९१ म्हणजेच ८४ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मृतांची एकूण संख्या ११ हजार ७०४ झाली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर रोज वाढत असून तो १.३८ टक्के झाला आहे. सध्या ५५ हजार ५ रुग्ण उपचार घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.