स्वबळावर उद्योगाची उभारणी करणारे चंद्रशेखर महाजन

स्वबळावर आपल्या उद्योगाची, व्यवसायाची जडणघडण करण्यासाठी अतिशय कष्ट उपसावे लागतात, यातूनच यशाची पताका आपण एक दिवस निश्‍चितपणे फडकवू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रशेखर प्रभाकर महाजन यांचे देता येईल. चंद्रशेखर महाजन यांनी स्वबळावर आपला व्यवसाय वाढवला आणि त्याचा विस्तार केला आहे. व्यवसाय वाढीच्या आणि विस्ताराच्या बाबतीत त्यांनी उलगडलेली माहिती सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. चंद्रशेखर महाजन यांची यशोगाथा..

 मूळचे भडगाव येथील असलेले चंद्रशेखर महाजन यांचा जन्म 1978 असून यांचे शिक्षण बीकॉम पर्यंत झालेले आहे. वडिलांचा मूळ व्यवसाय शेती होता. वडील प्रभाकर महाजन यांनी 1984 मध्ये महाजन हार्डवेअर हे दुकान भडगाव येथील चाळीसगाव रस्त्यावर सुरू केले. या दुकानावर चंद्रशेखर महाजन नेहमी जाऊन बसत असत. साधारणपणे 1990 म्हणजे सातवी शिकत असताना पासून ते या दुकानात जात असत. दुकानातील व्यवसायाचे बाळकडू त्यांना येथेच मिळाले. अनेक गोष्टी त्यांनी लहानपणातच आत्मसात केल्या,शिकून घेतल्या.

सुदर्शन कंपनीशी संपर्क

पदवी घेतल्या नंतर जळगावला नमस्कार 1999 ला एक प्रदर्शन पाहण्यासाठी चंद्रशेखर महाजन आले होते. प्रदर्शनामध्ये सुदर्शन सोलर चा स्टॉल त्यांनी पाहिला. सुदर्शन कंपनी चे विक्री प्रतिनिधी युवराज राजपूत यांचे मार्फत यांच्यामार्फत त्या काळी 39000/- रुपयात भडगावला सुदर्शन सोलर सिस्टिम बसवली. भडगावला दुकानावर येणारे अनेक ग्राहक याबाबत चौकशी करत होते. सोलर सिस्टिम कशी मिळवता येईल याबाबत मागणी देखील केली जात होती. चंद्रशेखर महाजन यांनी सुदर्शन सोलर कंपनीशी संपर्क साधून ग्राहकांच्या मागणी विषयी वारंवार सांगितले मात्र तांत्रिक अडचणींमुळे ग्राहकांची मागणी पूर्ण होऊ शकली नाही.

अशी झाली सुरुवात

2003 च्या सुरुवातीला सुदर्शन कंपनीचा माणूस भडगाव मध्ये आला त्यांनी सुचवले तुम्हीच कंपनीचे काम सुरू करा. त्यानंतरच्या काळात एकदा औरंगाबादला काही कामानिमित्त गेले असता, सहज सुदर्शन कंपनीच्या ऑफिसला चंद्रशेखर महाजन यांनी भेट दिली. सुदर्शन कंपनी कडे सेल्स एजन्सी ची मागणी केली. केवळ पाच हजाराची अनामत रक्कम देऊन 2004 ला सेल्स एजन्सी त्यांनी सुरू केली.

व्यवसाय वाढीसाठी घेतली अपार मेहनत

एखादी गोष्ट करायची ती अगदी मनापासून असा स्वभाव चंद्रशेखर महाजन यांचा असल्याने त्यांनी सुदर्शन सोलर च्या कामात स्वतःला झोकून दिले. हातात हँड बॅग घेऊन ते घरोघरी जाऊन डोअर टू डोअर मार्केटिंग करीत व्यावसाय चालू ठेवला, स्वतःचा व्यवसाय सोडून या उद्योगात चंद्रशेखर यांनी पडू नये असे घरच्या लोकांना वाटत होते. आणि त्यांनी सोलर व्यावसाय करण्यास मदत केली नाही, तरी सोलर च्या क्षेत्रामध्ये भविष्यात खूप मोठ्या संधी आहेत याची जाणीव चंद्रशेखर यांना झाली होती त्यादृष्टीने त्यांनी मेहनत करायला सुरुवात केली होती.सुरवातीच्या काळामध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत नव्हता , कारण त्या काळी सोलर वॉटर वर खर्च करण्याची लोकांची मानसिकता नव्हती कारण पाणी गरम करण्यासाठी चे इतर पर्याय स्वस्त होते, तरी त्यांनी लोकांना सोलर सिस्टीम विकत घेणे म्हणजे खर्च नव्हे तर भविष्यातील गुंतवणूक आहे आणि याचा फायदा लाइफ टाइम मिळतो असे महत्त्व पटवून देत, त्यातील फार थोडे लोक सकारात्मक प्रतिसाद देत, एखादी ग्राहक सोलर वॉटर हीटर घेण्यासाठी तयार झाला की त्या कडून एडवांस्ड रक्कम घेऊन त्यास सिस्टीम इंस्टाल स्वतः करुन देत, शिवाय त्यास प्लंबिंग काम देखील करून देत. हार्डवेअर दुकानात असलेला अनुभव प्लंबिंग काम करण्यास कामात आला त्याने सिस्टीम कमिशन व्यतिरिक्त कामाची मजुरी देखील मिळत असल्याने हे काम देखील आवडीने करत. सुरुवातीला महिना महिना एकाही ग्राहक मिळत नसत तरी चिकाटी सोडली नाही आणि त्यांची मेहनत फळाला आली आणि पहिल्याच वर्षी जवळपास 69 लोकांकडे सोलर वॉटर हीटर बसविण्यात यशस्वी झाले. चंद्रशेखर यांच्या मेहनतीला दाद देऊन सुदर्शन कंपनीचे प्रमुख संजय जिंतुरकर यांनी जळगावात काम करण्याचे सुचवले. सुरवातीच्या काळामध्ये चंद्रशेखर यांनी या गोष्टीला असमर्थता दाखवली. कारण आधीच्या काळात भडगाव, चाळीसगाव परिचित परिसरात व्यवसाय करीत होते आणि जळगाव जिल्हा चे ठिकाण नवीन शहरात कुठलाही सेट अप नसताना व्यवसाय करणे सोपे नव्हते तरी एक प्रयत्न म्हणून सुरुवातीला आठवड्यातील शनिवारी रविवारी असे दोन दिवस जळगाव येथे येऊन मार्केटिंग ची बॅग घेऊन डोअर् टु डोअर् फिरून एक एक ग्राहक मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असत. त्या काळात चंद्रशेखर यांच्या जवळ मोटर सायकल नसल्याने पायी फिरून ते काम करत होते.

2006 ला ते जळगावला शिफ्ट झाले आणि नवीन बी. जे. मार्केट मध्ये भाडे तत्त्वावर शॉप घेऊन “सुदर्शन सोलर सिस्टीम्स अँड एजेन्सी” ची स्थापना केली. जळगाव येथे शिफ्ट झाल्यावर मावस भाऊ अविनाश महाजन यांना देखील गावाकडून बोलावून यांच्या मदतीने त्यांनी व्यवसाय वाढीला सुरुवात केली. परन्तु भांडवलाची कमतरता आणि घर, दुकान सर्व रेंट वर असल्याने आणि त्या नुसार व्यवसाय होत नसल्याने महिन्याचा खर्च ही भागविणे मुश्किल होते, व्यवसायात नुकसान होत असल्याने आणि घरून ही मदत नाही, दरम्यान चे काळात मदतीला असणारे त्यांचे मावस भाऊ देखील त्यांना सोडून गेले, अश्या परिस्थितीत ही व्यवसाय वाढविण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न चालू ठेवले 2009-10 मध्ये सरकारने सोलर उत्पादनांवर सबसिडी द्यायला सुरुवात केली. त्याचा देखील लाभ चंद्रशेखर यांनी उचलला. व्यवसाय वाढविण्यावर भर दिला आणि व्यवसाय हळू हळू का होईना वाढू लागला . आता याच व्यवसायाच्या बळावर त्यांनी 2010 मध्ये जळगाव मध्ये स्वतः चे घर घेतले, दुकान घेतले, नंतरच्या काळात स्वतः साठी कार आणि व्यवसाय साठी मालवाहतूक गाडी देखील घेतली. रुपये पाच हजार अनामत रक्कम भरून सुरुवात केलेला व्यवसाय नावारूपाला येऊन वार्षिक उलाढाल ही अडीच कोटी पर्यन्त नेण्यात यश मिळविले आहे.

सर्विस देण्याला दिले प्राधान्य

व्यवसायाच्या सुरुवातीपासून चंद्रशेखर महाजन यांनी उत्पादन विकल्यानंतर चांगली सर्विस ग्राहकाला देण्यासंदर्भात पुढाकार घेतलेला आहे. ग्राहकाचे समाधान झाले तर तो इतरांना आपले नाव सुचवतो याविषयी चंद्रशेखर महाजन यांचे ठाम मत आहे. प्रामुख्याने सर्विस क्षेत्रावर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले. व्यवसायाच्या संदर्भामध्ये जळगाव मध्ये प्रामुख्याने श्री अवचित इलेक्ट्रिकल्सचे प्रशांत महाजन, श्रेयस ऍड चे राजेश पाटील, छबी इलेक्ट्रिक चे संचालक छबी सर यांचे सहकार्य चंद्रशेखर महाजन यांना लाभले .आणि अश्या अनेक लोकांचे सहकार्य देखील लाभले ज्या मुळे त्यांना जळगाव मध्ये जम बसण्यास मदत झाली. दरम्यानच्या काळामध्ये चंद्रशेखर यांनी डीलर्स चे नेटवर्क वाढवले चोपडा, भुसावळ, रावेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, अमळनेर, येथे डीलर्स ची नेमणूक केली. सोलर वॉटर हिटर मध्ये जवळपास 12000 चे वर समाधानी ग्राहक चंद्रशेखर महाजन यांनी मिळवलेले आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, अजिंठा लेणी परिसर यांच्यासह मोठे हॉस्पिटल हॉटेल मध्ये त्यांनी सोलर सिस्टिम बसविलेल्या आहेत.

सहकारी कर्मचारी यांना केले सब डीलर

सगळ्यांना सोबत घेऊन चालवण्याचा दृष्टिकोन जर असला तर सकारात्मक कार्य निश्चितपणे उभे राहते याचे उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रशेखर महाजन होय. चंद्रशेखर महाजन यांच्या बरोबर काम करणाऱ्या सहकारी कर्मचारी यांनाच त्यांनी पुढे सब डीलर म्हणून व्यवसायाची संधी दिली. यामध्ये प्रामुख्याने गणेश वैद्य, समाधान मुळे, ऋषिकेश चव्हाण, शाम पाटील, राहुल जैतकर, दिनेश वाडेकर या सहकाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व सहकारी एक वेळ चंद्रशेखर महाजन यांच्याकडे नोकरीला होते आता मात्र त्यांनी चंद्रशेखर यांच्या प्रेरणेने आणि सहकार्याने आपला स्वतः चा व्यवसाय सांभाळून आहेत. या व्यतिरिक्त आज सुदर्शन सोलर सिस्टीम्स अँड एजेंसी त्यांच्य स्वतः च्या ऑफिस मध्ये कायम स्वरूपी 12 जणांचा स्टाफ आहे शिवाय कॉन्ट्रॅक्ट वर 18 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

नव्या क्षेत्रात पदार्पण

2015 मध्ये शासनाने ऑन ग्रिड सिस्टिम लागू केली. सुरुवातीच्या काळात सुदर्शन कडून तयार सेट अप चंद्रशेखर महाजन घेत होते मात्र नंतरच्या काळात हा सेट अप पुरवतात. ग्राहकांना किफायतशीर दरांमध्ये चांगली सिस्टीम ते पुरवत असल्याने त्यांची विश्वासार्हता वाढली. “सुदर्शन सोलर पावर” या नावाने ते ग्राहकांना सिस्टिम पुरवित आहेत, मागील सहा वर्षात जवळपास 450 – ते 500 ग्राहकांकडे सोलर इलेक्ट्रिक सिस्टम बसविण्यात यशस्वी झाले आहेत आणि हा व्यवसाय त्यांच्या गुणवत्ता आणि सेवा या जोरावर अधिका अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यात यशस्वी होत आहेत.

जळगाव सोलर असोसिएशनची स्थापना

दरम्यानच्या काळामध्ये व्यवसाय वाढत असताना स्पर्धा देखील वाढू लागली. त्याच बरोबर काही प्रश्न देखील वाढू लागले होते. हे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आवश्यक होतं म्हणून चंद्रशेखर महाजन यांनी सम व्यावसायिक प्रशांत महाजन, अनुप आगीवाल, किशोर ढाके आणि इतर मिळून जळगाव सोलर असोसिएशनची स्थापना केली. यामध्ये जवळपास 115 सहकारी सम व्यवसायी आहेत. व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी काय करता येऊ शकेल यासाठी ही असोसिएशन काम करते.

भविष्यामध्ये सोलर ईव्ही चार्जिंग स्टेशन, सोलर वर ईलेक्ट्रीकल्स व्हेईकल्स चार्जिंग स्टेशन सर्विस सेट अप उभारून देणे चा नवीन व्यवसाय वाढविण्यासाठी विचार असल्याचे चंद्रशेखर महाजन यांनी सांगितले. त्याचबरोबर जळगावच्या बाहेरही बुलढाणा, धुळे, नासिक विस्तार असून या व्यतिरिक्त इतर जिल्हा मध्ये व्यवसाय विस्तार करणार असून, इ कॉमर्स वेबसाइट, मोबाईल ॲप तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहकांच्या सोयीसाठी टोल फ्री क्रमांक देखील त्यांनी सुरू केलेला आहे.

व्यवसाय नव्हे तर भू-माता आणि देशाची सेवाच

सोलर सिस्टीम मध्ये काम करणे ही एक प्रकारे देशसेवा, निसर्ग सेवाच आहे असे चंद्रशेखर महाजन म्हणतात. कारण सूर्य ऊर्जा ही नैसर्गिक शक्ती आहे. ती अमर्याद असून तिचा पुरेपूर वापर आपण केल्यास आपणास स्वच्छ आणि प्रदूषण विरहित ऊर्जा मिळणार असल्याने निसर्गाची हानी कमी प्रमाणात होण्यास मदत होईल, प्रदूषण कमी होणार आहे. वृक्षांचे संगोपनासह पर्यावरणाचे रक्षण देखील होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे सोलर चा व्यवसाय हा व्यवसाय नसून एक प्रकारे देशसेवाच आहे.

उत्पादनांची विस्तारीत रेंज उपलब्ध

चंद्रशेखर महाजन यांच्याकडे सोलर सिस्टिम प्रकारातील उत्पादनांची विस्तारीत रेंज उपलब्ध आहे. त्यामध्ये सोलर वॉटर हीटर, लो एनेर्जी वॉटर हिटर, सोलर स्ट्रीट, सोलर पंप, सोलर इन्वर्टर सिस्टीम ऑफ ग्रीड सिस्टीम, सोलर सिस्टिम, सोलर पॅनल, पॅनल स्ट्रक्चर, केबल इत्यादी सर्व प्रकारचे साहित्य चंद्रशेखर महाजन यांच्याकडे उपलब्ध आहे. घरावर सोलर सिस्टिम बसवण्यासाठी विविध बँका जवळपास 80 टक्के कर्ज देत आहेत त्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन चंद्रशेखर महाजन यांनी केले आहे.

SD Social Media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.