चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी टीव्हीची सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री जिची प्रत्येक घराघरात आज ओळख आहे असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तसेच तिचा अभिनयही आवडला आहे.
एका रिपोर्टनुसार, ‘अनुपमा’मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली भारतीय टेलिव्हिजनवर सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी ज्येष्ठ अभिनेत्री रुपाली गांगुली याआधी दररोज 1.5 लाख रुपये आकारू लागली होती, पण रिपोर्टनुसार, ती आता दररोज 3 लाख कमावते,असं बोललं जात आहे.
सध्या अनुपमा हा भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात ट्रेंडिंग शोपैकी एक आहे. शोचा टीआरपी खूप वाढत आहे. यातला मोठा हिस्सा निर्माते आणि अभिनेत्यांना जात असला तरी रुपाली गांगुलीची लोकप्रियता गगनाला भिडते आहे हे नाकारता येणार नाही.
या शोने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे आणि अनुपमाने भारतातील लहान शहरे आणि खेड्यांमधील लाखो घरांपर्यंत आपली पोहोच वाढवली आहे. बरं, गांगुलीचा पगार राम कपूर आणि रोनित बोस रॉयपेक्षा जास्त असल्याचंही अहवालात म्हटलं आहे.
44 वर्षीय अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वीच तिची फी वाढवली आहे. शोच्या प्रत्येक एपिसोडमध्ये ती ज्या प्रकारचा परफॉर्मन्स देत आहे ते पाहता हे योग्य आहे, असं देखील बोललं जात आहे.