सेफ्टी पिनला ‘सेफ्टी’ असे नाव का पडले तुम्हाला माहितीय?

सेफ्टी पिनचा वापर आपण बऱ्याच कामांसाठी करतो. याच्या मदतीने लोकं कपड्यांना फाटलेल्या किंवा शिलाई निघालेल्या जागी लावतात. याशिवाय लोकं बॅग फाटली किंवा कुठलीही वस्तु निघाली तर त्याला जोडून ठेवण्यासाठी वापरतात. या व्यतिरिक्त लोकं कान आणि दात स्वच्छ करण्यापासून ते कपड्यांची बटणं म्हणून देखील त्याचा वापर करतात. एका तारेने बनवलेली ही अतिशय छोटी वस्तू खूप उपयोगाची आहे. परंतु याला सेफ्टी पिनला ‘सेफ्टी’ असे नाव का पडले तुम्हाला माहितीय? या पिनाची निर्मिती नक्की कोणत्या कारणामुळे केली होती, याचा देखील एक इतिहास आहे. ज्याची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सेफ्टी पिनचा शोध कोणत्या कारणासाठी लावला गेला आणि ते कोणी बनवलं? याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. एवढच काय तर या व्यक्तीने चाकूला धार काढणारे उपकरण, स्पिनर आदींचाही शोध लावला. तसेच त्याने शिलाई मशीनही बनवले आहे.

सेफ्टी पिनचा शोध वॉल्टर हंटने लावला होता. वॉल्टर हंट अशा छोट्या छोट्या गोष्टी शोधण्यासाठी प्रसिद्ध होते. असे म्हटले जाते की, त्याच्यावर खूप कर्ज होते आणि ते कर्ज फेडण्यासाठी ते नवीन गोष्टी शोधत असायचे आणि असाच त्यांनी सेफ्टी पिन्सचा शोध लावला. यानंतर, जेव्हा त्याला कळले की ही एक उपयुक्त गोष्ट आहे, तेव्हा त्याने त्याचे पेटंट विकले आणि त्यातून त्याला 400 डॉलर मिळाले.

असे सांगितले जाते की, त्याच्या पत्नीच्या ड्रेसमधील बटण तुटले होते, त्यावेळी त्याने वायरने बननारे पिन तयार केले. ज्याला त्याने ड्रेस पिन असेनाव दिले. त्यामुळे या पिनचे खरे नाव ड्रेस पिन आहे.

असे म्हटले जाते की, त्याकाळी तारांच्या जागी सेफ्टी पिन वापरायचे. तसेच सुईच्या जागी देखील लोक सेफ्टी पिन वापरु लागले. ज्यामुळे लोकांच्या हाताला होणाऱ्या इंज्युरीस कमी झाल्या. यामुळेच त्याला सेफ्टी पिन असे नाव पडले. याला मुख्यता कपड्यांमध्ये वापरले जाण्यासाठी बनवले गेले. परंतु आता लोकं आपआपल्या युक्तीप्रमाणे आणि गरजेनुसार त्याचा वापर करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.