प्रेमात पडलेल्या तरुणाने भारत-पाक सीमा ओलांडण्याचा केला प्रयत्न

प्रेमासाठी माणूस काहीही करू शकतो, याचा प्रत्यय पुन्ह एकदा आला आहे. भारतीय तरुणीच्या प्रेमात पडलेल्या तरुणाने भारत-पाक सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अमीर असे या 22 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो भारताच्या सीमावर्ती भागात असलेल्या पाकिस्तानच्या बहावलपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. या तरुणाला राजस्थानमधील श्री गंगानगरमधून अटक करण्यात आली आहे. या तरुणाकडून केवळ एक मोबाईल आणि काही चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. आपण मुंबईतील एका तरुणीला भेटायला जात असल्याचा दावा या तरुणाने केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेबाबत अधिक माहिती देताना श्री गंगानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शर्मा म्हणाले की, पाकिस्तानच्या बहावलपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका तरुणाला श्री गंगानगरमधून अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अमीर असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून फक्त एक मोबाईल आणि काही चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या तरुणाची फेसबूकवर मुंबईमधील एका तरुणीशी मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. हा तरुण या तरुणीला भेटण्यासाठी पाकिस्तानमधून भारतामध्ये आल्याचा दावा त्याने चौकशीदरम्यान केल्याची माहिती शर्मा यांनी दिली आहे. दरम्यान या तरुणाने केलेला दावा खरा आहे का? याची आता पडताळनी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना शर्मा म्हणाले की, हा तरुण भारतामध्ये कासा आला? त्याने सीमा कशी ओलांडली याची चौकशी सुरू आहे. अद्याप या प्रकरणाशी संबंधित असलेल्या मुंबईमधील त्या तरुणीशी संपर्क करण्यात आलेला नाही, गरज पडल्यास तिच्याशी संपर्क करण्यात येईल. या तरुणाने केलेला दावा जर खरा असेल तर त्याला पुन्हा एकदा पाकिस्तानच्या ताब्यात देण्यात येईल. दरम्यान आपण मुंबईमधील तरुणीच्या प्रेमात पडलो. तीला भेटण्यासाठी आपल्याला भारतामध्ये यायचे होते. मात्र वारंवार व्हिसासाठी अर्ज करून देखील आपल्याला व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे आपन सीमा ओलांडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती या तरुणाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.