sdnewsonline चे राज्यभरातील असंख्य वाचक, जाहिरातदार, हितचिंतक, मार्गदर्शक आपणा सर्वांना ही दिवाळी आनंदमय-मंगलमय आणि आरोग्यपूर्ण जावो या सदिच्छा…!
टीम sdnewsonline
—————————————————————–
सर्जिकल स्ट्राईक प्रत्येक
भारतीयाला गर्व वाटणारी
नौशेरामध्ये तैनात जवानांच्या शौर्याचं वर्णन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईकच्या आठवणींना उजाळा दिला. सर्जिकल स्ट्राईकमध्ये इथल्या ब्रिगेडनं जी भूमिका निभावली, ती प्रत्येक भारतीयाला गर्व वाटणारी आहे”, असं ते म्हणाले. “सर्जिकल स्ट्राईकनंतर इथे अशांती निर्माण करण्याचे अनेक कुत्सित प्रयत्न झाले, आजही होतात. पण प्रत्येक वेळी इथे तोडीस तोड उत्तर दिलं जातं. असत्याविरुद्ध या मातीत एक स्वाभाविक प्रेरणा आहे. असं म्हणतात, की पांडवांनीही अज्ञातवासाच्या दरम्यान आपला काही काळ इथे घालवला होता”, असं पंतप्रधान म्हणाले.
कापूस पणन महासंघाकडून
खरेदीची शक्यता कमीच
सध्या खुल्या बाजारात कापसाला चांगला दर मिळत असल्याने आणि भारतीय कापूस महामंडळ थेट बाजारात खरेदीसाठी उतरल्याने राज्य कापूस पणन महासंघाच्या खरेदीची शक्यता कमीच असल्याचे चित्र आहे. कापसाची किमान आधारभूत किं मत धाग्यानुसार ५८०० ते ६३०० आहे. त्याहून अधिक म्हणजे जवळपास ३० टक्के जास्त भाव मिळत आहे. बाजारात व्यापारी भाव पाडतील तेव्हा पणनच्या खरेदीची खरी गरज राहील. सध्या त्याची गरज नसल्याने पणनची कापूस खरेदी सुरू करण्यात आलेली नाही, अशी माहिती अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी दिली.
कांदा किमतीत बसवावा
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याची किंमत कमी असल्याचे केंद्राने म्हटले आहे आणि दर कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचे आता परिणाम दिसून येत आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात माहिती दिली की, कांद्याच्या अखिल भारतीय किरकोळ आणि घाऊक किंमती सध्या अनुक्रमे ४०.१३ रुपये प्रति किलो आणि ३,२१५.९२ रुपये प्रति क्विंटल आहेत.
बिहारमध्ये दारू प्यायल्याने
१४ जणांचा मृत्यू
दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये गेल्या २४ तासांत १४ जणांचा विषारी दारू प्यायल्याने मृत्यू झाला आहे. गोपालगंज जिल्ह्यात सहा आणि बेतिया जिल्ह्यात सुमारे आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरजेडी नेते मनोज झा यांनी विषारी दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंवरून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. हेच राज्यातील कटू सत्य असल्याचं झा यांनी ट्विट करून म्हटलं आहे.
राज्यात करोनावरील लसीकरण
३-४ दिवस बंद रहाणार
पुढील ३-४ दिवस मात्र राज्यात करोनावरील लसीकरण हे बंद रहाणार आहे. अर्थात राज्य सरकारतर्फे अधिकृत जाहीर केलं नसलं तरी अनेक महानगरपालिकांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिवाळीनिमित्त लसीकरण बंद ठेवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे पुढील ३-४ दिवस राज्यातील लसीकरणाचा वेग हा कमी असणार आहे. मुंबई, पुणे महानगरपालिकांनी लसीकरण केंद्र बंद रहाणार आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतरही
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच
महागाई भत्त्यात वाढ आणि त्यानंतर एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याच्या मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या संपामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे. संप वा काम बंद करण्यास एसटी कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. या प्रकरणी गुरुवारी ११ वाजता सुनावणी होणार होती. मात्र एसटी कामगारांच्या संघटनांनी उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.
फटाका गिळला, तीन
वर्षाच्या मुलाचा मृत्यू
गुजरातमधल्या सूरत इथल्या डिंडोली भागात राहणाऱ्या एका तीन वर्षांच्या मुलाला अचानक उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर त्याला जुलाबाचा त्रासही सुरू झाला. त्यानंतर त्याचे वडील त्याला दवाखान्यात घेऊन गेले. मुलाच्या आईने डॉक्टरांना सांगितलं की या मुलाने फटाका गिळला आहे. त्यानंतर डॉक्टरांनी या मुलावर उपचारही सुरू केले. मात्र, त्याला वाचवण्यात डॉक्टरही अपयशी ठरले.
भाजपला पराभूत करा पेट्रोल
डिझेलचे भाव कमी होणार
भाजपाला तुम्ही जितका वेळ पराभूत करणार तितका पेट्रोल – डिझेलचा भाव कमी होत राहणार. ही लूट थांबवायची असेल तर भाजपाला पराभूत करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जनतेला केले आहे. निवडणुकांच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी दरात कपात केल्याने विरोधक भाजपावर निवडणूक हरल्यामुळे दरात कपात केल्याची टीका करत आहेत.
पेट्रोल डिझेलवरील उत्पादन
शुल्कात 5,10 रुपयांची कपात
दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 5 आणि 10 रुपयांची कपात केली. कच्च्या तेलाच्या विक्रमी किमतींमध्ये 3 वर्षांतील केंद्रीय उत्पादन शुल्कात ही पहिली कपात आहे.
SD social media
9850 60 3590