डासांमुळे दरवर्षी 10 लाखांहून अधिक लोकांचा होतो मृत्यू

दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आपले डोक वर काढत असतात. यावर नीट उपचार घेतले नाही तर, मृत्यू ओढावण्याचीही शक्यता असते. दरवर्षी डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांनी लाखो लोकांचे बळी जातात. मग प्रश्न पडतो आतापर्यंत आपण हे मृत्यू का रोखू शकत नाही. डासांचे संपूर्ण उच्चाटन केल्यास त्याचा काय परिणाम होईल, परंतु निसर्ग साखळीत प्रत्येक प्राणी एकमेकांवर अवलंबून आहे.

वर्ल्ड मॉस्किटो प्रोग्रामच्या अहवालानुसार, दरवर्षी 700 दशलक्ष लोक डासांमुळे पसरणाऱ्या आजारांनी ग्रस्त असतात. त्यापैकी 10 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. डेंग्यू आणि मलेरियासारखे अनेक आजार आणि डासांमुळे लाखो मृत्यू होऊनही शास्त्रज्ञ त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. डास हे अनेक जीवांचे अन्न आहे, ते संपले की त्या जीवांवर नवे संकट उभे राहील.

नर डास हा फुलांचा रस शोषून आपले पोट भरत असतो. तर मादी डास मात्र चावा घेऊन रक्त शोषून आपले पोट भरते. साहजिकच मादा डासांपासून मानवी आरोग्याला मोठा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे यावर शास्त्रज्ञांनी विशेष प्रयोग करण्याचे ठरवले आहे. ऑस्ट्रेलियाच्या मोनाश युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी डेंग्यूचा नायनाट करण्यासाठी ज्यामध्ये वोल्बॅचिया नावाचा जीवाणू आढळतो अशा डासांची निवड केली आहे. हा जीवाणू डेंग्यूच्या विषाणूविरुद्ध लढतो. शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत या डासांची पैदास करून असे शेकडो डास तयार केले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात असे डास प्रयोगशाळेत तयार करून वातावरणात सोडले जातात, तेव्हा त्यांच्या प्रजननातून त्यांच्याच प्रकारच्या डासांची संख्या वाढेल, पण डेंग्यूसारखे आजार पसरणार नाहीत, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.

लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या शास्त्रज्ञांनी मादी डासांपासून नवी उत्पत्ती होणार नाही, असा एक नवा प्रयोग केला आहे. मात्र, त्यांमुळे डासांची संख्या कमी होईल. शास्त्रज्ञ मादी डासांच्या जनुकांमध्ये असे बदल करत आहेत की ते प्रजननासाठी टिकत नाहीत. मादी डासांमध्ये असलेल्या डबलसेक्स जनुकामध्ये बदल करण्यात आला आहे असून त्यामुळे मलेरियाला आळा बसणार आहे.

डास संपले तर काय होईल?

यूएसए टुडेनुसार, जगात डासांच्या 3500 हून अधिक प्रजाती आहेत. उदा. अॕनोफिलीस गॅम्बिया मलेरिया पसरवते. एडिस इजिप्तीमुळे डेंग्यू होतो. परंतु रोग दूर करण्यासाठी, संपूर्ण डासांना नष्ट करण्याची गरज नाही.

सिडनी विद्यापीठातील इटिमोलॉजिस्ट कॅमेरॉन वेब यांच्या मते, डास जगातून नष्ट झाले तर तात्पुरत्या स्वरुपात त्याचा परिणाम फक्त मानवांवरच होईल. डास संपल्याने मासे, पक्षी, सरडे, बेडूक आदी भक्षकांना अन्न मिळणार नाही.

डास नष्ट झाल्यास त्यावर अवलंबून इतरांवर अन्नसंकट निर्माण होऊन परिसंस्थेचे चक्र बिघडेल.

जगभरातील डास कमी झाल्यामुळे मलेरिया आणि डेंग्यूसारख्या आजारांमुळे होणाऱ्या लाखो मृत्यूंची संख्या दरवर्षी कमी होईल.

डासांचे संपूर्ण उच्चाटन करण्याबाबत शास्त्रज्ञांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. त्यांची संख्या कमी झाल्यास पर्यावरणाचा समतोल बिघडेल, असे काहींचे मत आहे. तर दुसरीकडे लाखो लोकांचे जीव वाचतील असेही काहींचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.