वाईन विक्रीला विरोध, शाहीर हेमंतराजे मावळे व्यसनमुक्ती पुरस्कार परत करणार

महाराष्ट्र शासनाने मॉल व सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री परवानगी दिली, या धोरणाला सर्वच स्तरातून विरोध होताना दिसून येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या वाईन विक्री धोरणाला विरोध व आपल्या निषेध नोंदवण्याचा निर्णय शाहीर हेमंत मावळे यांनी घेतला आहे. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे यांनी त्यांना व्यसनमुक्ती क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल दिलेला महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्काराने गौरवले होते.

हा पुरस्कार गौरव पुणे स्टेशन येथील त्यांच्या पुतळ्यापाशी ठेवून, जिल्हाधिकाऱ्यांना हा पुरस्कार परत करणार असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीच्यादिवशी महाराष्ट्र शासनाची सद्सद्विवेकबुद्धी जागी होवो, अशी प्रार्थना देखील यावेळी करण्यात आली.

शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, अनेक वर्षे व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात मी काम करत आहे. शाहिरीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा प्रचार करतो. महाराष्ट्र शासनाने दिलेला हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. शासनाच्यावतीने देण्यात आलेला हा पहिला पुरस्कार आहे.परंतु, सरकार जर अशा प्रकारचे निर्णय घेत असेल तर हा पुरस्कार स्वतःजवळ ठेवणे योग्य नाही, त्यामुळे हा पुरस्कार मी परत करत आहे. पूर्णपणे दारूबंदी शक्य नसली तरी असे निर्णय घेणे चुकीचे आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, प्राध्या.संगीता मावळे , शाहीर महादेव जाधव , नगरसेवक योगेश समेळ , ह.भ.प.मंगलमूर्ती औरंगाबादकर , संजय कोंडे , अनिल दिवाणजी व प्रबोधिनीचे सेवाव्रती उपस्थित होते.

नागरिकांचा विरोध शहरातील नागरिकांनी सरकारच्या सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या धोरणाचा निषेध केला आहे. अनेकांनी नागरिकांनी वाईन शॉपमध्ये किरणा सामना मिळणार का ? असा सवाल केला आहे. सरकारचा हा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केला आहे. अनेकदा कटुंबियांच्या सोबत वाईन विक्रीसाठी येत असतो. अश्यावेळी वाईन सुपर मार्केटमध्ये असने योग्य होणार नसल्याच्या प्रतिक्रियाही नागरिकांनी नोंदवल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.