दिल्लीत मानवतेला काळिमा फासणारी घटना, संपत्तीसाठी आजीला केले कुत्र्याच्या स्वाधीन

संपत्तीसाठी लोक कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. याचेच उदाहरण म्हणून दिल्लीत एक मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. संपत्तीच्या वादातून चिडलेल्या नातवाने चक्क आपल्या आजीला लचके तोडण्यासाठी कुत्र्यांच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील ईस्ट नगर भागात घडली आहे. यामध्ये आजी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी कल्याणपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी नातवाविरोधात कमल 289 नुसार गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना नोटीस बजावून या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यास सांगितले आहे.

आत तकने दिलेल्या माहितीनुसार, पीडित 70 वर्षीय महिला दिल्लीतील विनोद नगर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहते. महिलेचा मुलगा आणि नातू संपत्तीसाठी नेहमीच या महिलेचा छळ करतात. सहा महिन्यांपूर्वी आरोपी नातवाने घरी कुत्रा आणला होता. मात्र आजी वारंवार नातवाला हा कुत्रा धोकादायक आहे, त्याला घरी ठेवू नको असे सांगत होती. तरीही नातवाने कुत्रा घरात ठेवून घेतला.

वृद्ध महिलेने सांगितले की, संपत्तीच्या वादातून 13 जानेवारी रोजी तिच्या नातवाने कुत्र्याकडून तिच्यावर हल्ला करवला. यावेळी कुत्र्याने महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावे घेतले. याप्रकरणी महिलेने DCW च्या 181 महिला हेल्पलाइनवर 20 जानेवारी 2022 रोजी कॉल केला आणि तक्रार केली. यावर महिला आयोगाच्या पथकाने महिलेच्या घरी पोहोचून प्रकरणाचा आढावा घेतला. आपल्या जीवाला धोका असल्याचे महिलेने या पथकाला सांगितले. आयोगाच्या पथकाने महिलेला कल्याणपुरी पोलिस ठाण्यात नेले आणि तेथे कलम 289 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस देऊन माहिती मागवली आहे. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे का, अशी विचारणा आयोगाने दिल्ली पोलिसांना केली आहे. नसेल तर कारण द्या. याशिवाय वृद्ध महिलेच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कोणती पावले उचलली आहेत. आयोगाने याप्रकरणी केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवालही मागवला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ही माहिती 31 जानेवारी 2022 पर्यंत उपलब्ध करून द्यावी, असे आयोगाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.